बाबाच माझे बेस्ट फें्र ड

By Admin | Updated: June 20, 2015 23:59 IST2015-06-20T23:59:50+5:302015-06-20T23:59:50+5:30

दर वर्षीप्रमाणे ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात ‘फादर्स डे’ शहरासह परिसरात पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाबरोबरच साजरा करण्यात येणार आहे.

My best friend | बाबाच माझे बेस्ट फें्र ड

बाबाच माझे बेस्ट फें्र ड

बारामती : दर वर्षीप्रमाणे ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात ‘फादर्स डे’ शहरासह परिसरात पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाबरोबरच साजरा करण्यात येणार आहे. एकविसाव्या शतकात आता पालकत्वाच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी असणाऱ्या जागतिक पितृदिनानिमित्त तरुणाईने आपले विचार व्यक्त केले. वॉशिंग्टन येथील सोनोरा लुईस स्मार्ट डॉड यांनी आपले वडील यांच्या स्मरणार्थ १९१० मध्ये पहिल्यांदा ‘फादर्स डे’ ची संकल्पना सुरू केली. त्यानंतर विविध देशांत साजरा करण्यात येऊ लागला. जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभर हा पितृदिन साजरा केला जातो.
प्रत्येक मुलाचा पहिला मित्र हा त्याचे वडील असतात. प्रसंगी रागावणारे, प्रेम करणारे, पण त्याच वेळी पाठीशी घालणारे हे ‘बाबा’च असतात. एकविसाव्या शतकात धावपळीच्या स्पर्धेच्या या युगात ‘थकलेल्या बाबाची’ कहाणी ऐकायला मिळत असेल. मात्र, या धावपळीत आपल्या पाल्यांशी संवाद साधण्यात ते अजूनही तरीही या पार्श्वभूमीवर बारामतीतील तरुणाईशी संवाद साधला असता, आपल्या वडिलांशी असलेल्या नात्याविषयी त्यांनी आपली मते व्यक्त केली. वर्षातून एकदाच येणाऱ्या या पितृदिनानिमित्त थोड्या आधुनिक पद्धतीने ‘सेलिब्रेशन ’केले जाते.
बारामतीतील कुणाल दळवी म्हणाला, की मी माझ्या वडिलांचा मनापासून आदर करतो. विद्या प्रतिष्ठानच्या इयत्ता आठवीत शिकणारा साईराज हगवणे या विद्यार्थ्यांने मी तर रोजच ‘फादर्स डे ’ सेलिब्रेट करतो, माझे वडील माझी प्रेरणा आहेत. ते मला अभ्यासात मदत करतात. म्हणून ते मला आवडतात, असे सांगितले. मला माझे पप्पा खूप आवडतात. ते माझे खूप छान मित्र आहेत. जंक्शन (ता.इंदापूर) येथील युवक व डेहराडून येथे लेफ्टनंट पदावर कार्यरत असलेले अमित दिलीप काळे यांनी सांगितले, की आज सैन्य दलात या पदावर काम करण्याचा दिवस केवळ माझ्या वडिलांमुळे मी पाहू शकलो. माझा भाऊदेखील सैनिक शाळेत शिक्षण घेत आहे. आम्ही दोघ भावंडे वडिलांच्या त्यागातूनच घडलो. आमची शाळेची फी भरण्यासाठी त्यांनी आयुष्यात नेहमीच काटकसर केली. चित्रपट पाहणे, फिरणे आदींचा त्यांनी आमच्यासाठी त्याग केला. समाजातील चांगल्या वाईट गोष्टींची समज त्यांच्यामुळे आम्हाला कळाली. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी आम्हा भावंडांसमवेत इतरांना देखील चांगल्या मार्गावर नेण्याचा नेहमीच प्रयत्न केला.

Web Title: My best friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.