शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सिमेंटीकरणाने मुठा नदीकाठच्या पाणथळ जागा नष्ट; संवर्धन करणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 20:04 IST

पर्यावणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाणथळ किंवा जलमयभूमी जपणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देसंवर्धन करायला हवे ; जीवसृष्टी, पक्ष्यांसाठी येथे परिसंस्था

पुणे : नदीकाठी पाणथळ जागा असेल, तर तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पण मुठा नदीच्या काठी सिमेंटने बांध घातला आहे. परिणामी पाणथळ जागा तयार होऊ शकत नाही. भविष्यात तर नदी सुधार योजनेतंर्गत अजून सिमेंटीकरण होईल. त्यामुळे अशी जागा नदीकाठी शोधूनही सापडणार नाही आणि पाणथळ जागेतील परिसंस्थाच नष्ट होणार आहेत.

पर्यावणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाणथळ किंवा जलमयभूमी (Wasteland) जपणे आवश्यक आहे. खरं तर या जागा निरूपयोगी समजल्या जातात. पण त्या पर्यावरणासाठी खूप उपयोगी आहेत.  मानवनिर्मित पाणथळ जागा जायकवाडी जलाशय, उजनी जलाशय येथे आहेत.  म्हणून येथे थंडीत खूप पक्षी खाद्याच्या शोधात येतात. परिसंस्थेतील हा एक घटक आहे. अनेक ठिकाणी या जागा बिनकामाच्या (माणसासाठी) म्हणून बुजवल्या गेल्या आहेत. नदीकाठ तर हमखास बुजवतात. सिमेंटीकरण करून काठ सुंदर करण्याच्या नादात या पाणथळ जागा नष्ट होत आहेत.===============जीवितनदीने तयार केली अशी जागा  पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे, त्यांचे संवर्धन व्हावे म्हणून पाणथळींबद्दल जाणीव जागृतीसाठी २ फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा होतो. जीवितनदीने विठ्ठलवाडी येथे अशी जागा तयार केली आहे. तिथे अनेक पक्षी येत आहेत. तशा जागा इतर ठिकाणी व्हायला हव्यात, असे प्रिया फुलंब्रीकर यांनी सांगितले.

==========================पाणथळ जागाचे उपयोग :* अन्न तयार होते व होतो साठा* अन्न साखळी निरोगी ठेवते* मासे व जलचर प्राण्यांचा अधिवास* पाणपक्ष्यांचं आश्रयस्थान*भूजलसाठा नियंत्रित होतो* गाळ धरून ठेवण्याची क्षमता=================जगातील ४०% सजीव हे पाणथळ प्रदेशावर जगतात. नदी, सरोवरे यांलगतचा दलदली प्रदेश हा परळ (Persicaria glabra), कमळ, हळदी-कुंकू, अझोला, पाणकणीस, पाणलवंग, हायड्रीला तसेच वाळुंज, कदंब, अर्जुन, जांभुळ, करंज अशा अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व गवतांनी भरलेला असतो. त्या वनस्पतींवर जगणारे जलचर, प्राणी, पक्षी व कीटक हे तिथे नित्यनेमाने भेट देत असतात किंवा तिथेच वस्ती करून राहत असतात. तसेच हे दलदलीचे प्रदेश फ्लेमिंगो, स्पूनबील, आयबीस, चित्रबलाक अशा काही स्थलांतरित पक्ष्यांचे उत्तम आश्रयस्थान ठरतात. प्रदूषित पाणी गाळण्याचे कार्य याच वनस्पतींमार्फत होते. अशाप्रकारे जलप्रदूषण रोखण्यास व पर्यावरण शुद्ध करण्यास या पाणथळींचा हातभार लागतो.  -  प्रिया फुलंब्रीकर, जीवितनदी च्या संस्थापक सदस्य  व ग्रीन बर्ड्स अभियानाच्या संस्थापक  

टॅग्स :Puneपुणेriverनदीenvironmentपर्यावरण