शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Mutha Canal : जलतांडवाने आक्रोश, संसार उद्ध्वस्त, अनेकांचे सर्वस्व नेले हिरावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 01:15 IST

सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान पूलानजीक असणाऱ्या मुठा कालव्याचा भराव खचून वेगाने ते पाणी परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये शिरले. अवघ्या क्षणात होत्याचे नव्हते झाले.

पुणे : सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान पूलानजीक असणाऱ्या मुठा कालव्याचा भराव खचून वेगाने ते पाणी परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये शिरले. अवघ्या क्षणात होत्याचे नव्हते झाले. काही काळानंतर, ते पाणी सिंहगड रस्त्यावर आले. तोपर्यंत त्या पाण्याने झोपडपट्टीत राहणाºया नागरिकांचे सर्वस्व हिरावून नेले होते.एरवी नेहमी रहदारीमुळे गर्दी असलेल्या दांडेकर पुलावर मात्र पुढील काही वेळातच शुकशुकाट पसरला. एव्हाना पाणी सिंहगड रस्त्यावर येऊन पोहोचले होते. अचानक आलेल्या याप्रकारच्या संकटामुळे सर्वजण भेदरलेल्या अवस्थेत होते. त्या वेळी काय करावे, त्या परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जावे हेच त्यांना सुचेनासे झाले. वेळच तशी होती की कालव्यातील पाण्याने त्यांना त्या भयाण संकटातून सुटकेकरिता विचार करण्याची कुठलीच संधी दिली नाही. घरात संसारापयोगी म्हणून जे काय होतं ते सगळं त्या पाण्याने आपल्यासोबत वाहून नेलं. यानंतर मागे उरला आकांत आणि आक्रोश.पाण्याचा प्रचंड लोंढा झोपडपट्टीत शिरता क्षणीच घरातील महिलांनी आरडाओरड केली. पुरुषमंडळी सकाळीच कामानिमित्त बाहेर पडले होते. तर मुले शाळेत गेलेली. एकीकडे संसार पाण्याबरोबर वाहून गेला असला, तरी आपली मुलं मात्र सुरक्षित राहिल्याने महिलांनी देवाचे आभार मानले. कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे असे कळताच पुरुषांनी तातडीने घराकडे धाव घेतली. तोपर्यंत उशीर झाला होता. त्या पाण्याने आपल्या सोबत वाहून नेण्याचे काहीच शिल्लक ठेवले नव्हते. कष्टकºयांच्या नशिबी अशा परीक्षा कायमच येत असतात. यावेळीही निर्दयी नियतीने तेच केले.नाल्यामध्ये पाणी वळल्याने विध्वंस टळलाकालवा ज्याठिकाणी फुटला त्याच्या जवळून एक नाला वाहतो. त्यामुळे कालव्यातून वेगाने आलेले पाणी या नाल्यातून पुढे सिंहगड रस्त्यापर्यंत आले. हा नाला रस्त्याच्या खालून पुढे दांडेकर पूल वसाहतीतून जात आंबिल ओढ्याला मिळतो. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे रस्त्यालगत हे पाणी अडले गेले. त्यामुळे मोठा प्रवाह रस्त्यावरून वसाहतीत घुसला; पण मोठ्या प्रमाणावर कालव्यातील पाणी नाल्यातून पुढे आंबिल ओढ्यात गेले. हा नाला असल्यामुळे पाण्याला दिशा मिळाली. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर पाणी नाल्यातून वाहत होते. हा नाला नसता, तर आणखी हानी झाली असती.अतिक्रमण, उंदीर, घुशींनी फोडला कालवा ?पुणे : खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंतच्या कालव्याच्या भोवताली बेकायदेशीर बांधकामांचे अतिक्रमण झाले आहे. जलवाहिनीच्या कामासाठी त्यातील काही अतिक्रमणे सुमारे एका वर्षापूर्वी महापालिकेने काढून टाकली. या भुसभुशीत झालेल्या जमिनीत उंदीर, घुशींनी अनेक छिद्रे केल्यामुळे कालव्याचा मातीचा पाया खचला. त्यामुळे कालवा फुटण्याची घटना घडली, असा तर्क जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी लावला आहे.अनधिकृत केबल खोदाईमुळेच कलव्याला भगदाडपुणे : मुठा उजव्या कालव्याला ज्या ठिकाणी भगदाड पडले तेथे कालव्याच्या मातीच्या भिंतीमध्येच अनधिकृतपणे केबल खोदाई करून तब्बल ६ केबल टाकण्यात आल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी कालव्याच्या शेजारीच महापालिकेने बंदिस्त पाइपलाइन टाकण्याचे काम केले. यामुळेदेखील कालव्याची मातीची भिंत ढिसाळ झाल्याने ही दुर्घटना झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खडकवासला मुठा उजवा कालव्याला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ भगदाड पडले. त्यानंतर हा कालवा कसा फुटला याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, या कालव्याला ज्या ठिकाणी कालव्याला भगदाड पडले, त्या ठिकाणी कालव्याच्या मातीच्या भिंतीमध्ये तब्बल ६ केबल टाकण्यात आल्या आहेत.

महापौरांना करावा लागला नागरिकांच्या संतापाचा सामना१पुणे : कालवा फुटल्याने सिंहगड रस्त्यावर निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक व स्थानिक नगरसेवक घटनास्थळी आले. त्या वेळी प्रशासनाचे दुर्लक्ष व हालगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि आमचे संसार रस्त्यावर आल्याची संप्तत भावना व्यक्त करत नागरिकांनी महापौर व महापालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. प्रशासन मदतीसाठी उशिरा पोहोचल्याने ‘मतं मागायला येता, मदतील कधी येणार’ असा सवालदेखील उपस्थित केला.२कालव्याला सव्वा आकराला भगदाड पडले आणि काही क्षणातच हजारो कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले. परंतु हक्केच्या अंतरावर असलेले महापालिका प्रशानस, महापालिकेचे आपत्ती निवारण कक्षाचे लोक यापैकी कोणीदेखील तास-दीड तासात घटनास्थळी आले नाही, असा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केल्याचे महापौरांना सांगितले. आमचे संसार वाहून गेले़ आता काय पाहिला आल्या, असे सांगत महिल्यांनी महापौरांना घेरावा घातला. यामध्ये काही लोकांनी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणादेखील दिल्या. महापौर आल्यानंतर बाधित लोकांनी प्रचंड गर्दी केली़ घोषणाबाजी, नागरिकांचा संताप यामुळे महापौरांची प्रचंड गोची झाली. अखेर परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून परिसराची पाहणी न करताच परत गेल्या.वाहतूककोंडीने उडाला हाहाकारपुणे : पर्वती येथे मुठा कालवा फुटून त्या पाण्याने सिंहगड रोडवर पूर आल्याने त्याचा परिणाम शहरातील अनेक रस्त्यांवरील वाहतूक जवळपास ३ तास ठप्प झाली. अनेक रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दांडेकर पुलाजवळ गुरुवारी सकाळी कालवा फुटल्याने पाणी वेगाने वाहून सिंहगड रस्त्यावर आले़ त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलापासून सिंहगडकडे जाणारी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली़ दांडेकर पुलाच्या चौकातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने चौकातील वाहतूकही बंद पडली़ त्याचा परिणाम होऊन सारसबागेकडून येणारी पूर्णपणे थांबल्याने रांगा सारसबागेपर्यंत गेल्या़

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या