शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

आरक्षणासाठी मुस्लिम समाजाकडून मोर्चाची घोषणा; चार ते पाच लाख मुस्लिम बांधव एकत्र येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 22:31 IST

मुस्लिम समाजाला यापूर्वी जे आरक्षण होते ते काढून घेण्यात आले. समाजातील युवक बेरोजगार राहत आहेत. असुरक्षितता वाढत असून सतत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे.

पुणे : मुस्लिम समाजाला यापूर्वी जे आरक्षण होते ते काढून घेण्यात आले. समाजातील युवक बेरोजगार राहत आहेत. असुरक्षितता वाढत असून सतत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. यासगळ्यात मात्र सरकारकडून केवळ मतांचे राजकारण केले जात आहे. यापुढील काळात मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे. याकरिता 9 सप्टेंबर रोजी मूक महामोर्चा काढण्यात येणार आहे. अशी घोषणा मुस्लिम मूक महामोर्चा समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली. 

 समितीने सोमवारी पत्रकार परिषदेत घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी मुस्लिम समाजाला सरकारने दिलेले पाच टक्के आरक्षण कायम करण्यात येवून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही मुख्य मागणी केली आहे. यासाठी 9 सप्टेंंबरला सकाळी दहा वाजता पुणे गोळीबार मैदान ते नेहरु रस्ता, सेव्हन लव्ह चौक मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा जाणार आहे. यात चार ते पाच लाख मुस्लिम बांधव सहभागी होणार आहेत. समाज बांधवांचे प्रबोधन करण्याकरिता आतापर्यंत पाच बैठका घेण्यात आल्या आहेत. या मोर्चास शहरातील अनेक आंबेडकरी विचाराच्या संघटना, पक्ष यांचा पाठिंबा मिळाला असून त्यांनी बैठकीत आपला सहभाग नोंदवला. मोर्चाच्या नियोजनासाठी शुक्रवारी (10आॅगस्ट) रोजी सायंकाळी साडेसात वाजता भवानी पेठ येथील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम याठिकाणी सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  5 हजार स्वयंसेवक मोर्चात कार्यरत राहणार असून शांततेच्या मार्गाने, कुठल्याही घोषणा न देता मोर्चा पार पडणार असल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले. 

समितीच्या प्रातिनिधिक म्हणून समरीन कुरेशी या युवतीने मुस्लिम बांधवांची भूमिका मांडली. ती म्हणाली, मुस्लिम समाज अडचणीतून जात आहे. सरकार केवळ मत मागण्यासाठी येते. सुधारणा काही नाहीत. संविधानात तर सर्वजणांना एकच न्याय सांगितला असताना येथे प्रत्येकाला वेगवेगळ्या पध्दतीने वागविले जात आहे. समानता कुठेही दिसत नाही. पदवीधरांना नोकरी नाही. सरकारने नोकरीतील आरक्षण काढले. ज्या पध्दतीने इतर जातींना आरक्षण दिले जात आहे त्याच पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना आरक्षण मिळावे ही आमची मुख्य मागणी आहे. 

मुस्लिम समाजाच्या मागण्या 

- मुस्लिम समाजाला सरकारने दिलेले पाच टक्के आरक्षण कायम करण्यात यावे.

- देशभरामध्ये मॉबलिंचीगच्या घटनांमध्ये 78 पेक्षा जास्त मुस्लिम समाजाच्या लोकांचे खुन करण्यात आले आहेत. त्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी

- संविधानिक मान्यता असलेल्या मुस्लिम पर्सनल कायद्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करु नये

- वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण दूर करण्यात यावे

- दलित व मुस्लिमांवरील जातीय धार्मिक अत्याचाराच्या घटना रोखण्यात याव्यात

- मुस्लिम समाजाला अँट्रोसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात यावे. यासारख्या मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात येणार आहे. 

टॅग्स :reservationआरक्षणPuneपुणेMuslimमुस्लीम