'सवाई'ला आलेल्या रसिकांना ऐकावे लागणार दंडाचे गाणे; पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहनांना ‘जॅमर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:59 IST2017-12-16T17:53:46+5:302017-12-16T17:59:44+5:30
सवाई ऐकायला आलेल्या गानरसिकांना पुणे वाहतूक शाखेने दणका दिला आहे. वाहनांना जॅमर लावण्यात आल्याने रसिकांना मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे.

'सवाई'ला आलेल्या रसिकांना ऐकावे लागणार दंडाचे गाणे; पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहनांना ‘जॅमर’
ठळक मुद्दे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सगळी वाहने जॅमर लावून केली जामसवाई संपल्यावर गायनप्रेमींना पोलिसांना द्यावे लागणार तोंड
पुणे : सवाई ऐकायला आलेल्या गानरसिकांना पुणे वाहतूक शाखेने दणका दिला आहे. वाहनांना जॅमर लावण्यात आल्याने रसिकांना मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे.
सवाई ऐकायला आलेले रसिक आपली वाहने महर्षी शिंदे पुलाच्या दोन्हु बाजूला लावून जात असतात. त्यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही सगळी वाहने जॅमर लावून जाम केली. तब्बल ६०हून अधिक वाहने पोलिसांनी अशी जाम केली. दुपारपासून गानसमाधी लावलेल्या रसिकांना याची कल्पनाच नव्हती. सवाई संपल्यावर या गायनप्रेमींना आता पोलिसांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यांच्याकडून दंडाचे गाणे ऐकल्याशिवाय पोलीस त्यांची वाहने सोडण्याची सूतराम शक्यता नाही.