शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

विजय मोहोळांचा पण वाद कसब्यात! "हे गिरीश बापटांचे संस्कार नाहीत..." श्रेयवादावरून गौरव बापट संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 16:14 IST

शहराध्यक्ष धीरज घाटे आणि भाजप पदाधिकारी असलेल्या हेमंत रासने यांच्यात ही चढावर सुरू आहे...

- किरण शिंदे 

पुणे : नुकत्याच पार पडलेल्या पुणे लोकसभा निवडणुकीत भाजपचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) विजयी झाले. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा (Ravindra Dhangekar) त्यांनी एक लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव केला. पोटनिवडणुकीत करिष्मा दाखवणाऱ्या धंगेकरांची कसबा विधानसभा मतदारसंघातूनच पिछेहाट झाली. कसब्यातून भाजपने जवळपास १५ हजार मतांनी लीड मिळवले. आता याचे श्रेय घेण्यासाठी सध्या पुणे भाजपमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे.

शहराध्यक्ष धीरज घाटे आणि भाजप पदाधिकारी असलेल्या हेमंत रासने यांच्यात ही चढावर सुरू आहे. यासाठी संपूर्ण कसबा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आली. यावरूनच दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट चांगलेच संतापले आहेत. माझ्यामुळेच कसे मताधिक्य मिळाले हे सांगण्याची सध्या चढाओढ सुरू आहे हे पाहून वाईट वाटते असं म्हणत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

गौरव बापट यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 

"निवडणुका पार पडल्या. पुणे शहरातील सुज्ञ मतदारांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला. मुरलीधर मोहोळ खासदार झाले. अगदी लाखाच्या पुढे मताधिक्य मिळाले. परंतु या विजयात कोणी एकच वाटेकरी आहे आणि माझ्यामुळेच कसे मताधिक्य मिळाले हे सांगण्याची जी अहमहमिका पुणे शहरातील काही भाजप नेते आणि काही व्यक्तीमध्ये सुरू आहे ते बघून वाईट वाटते. 

या निवडणुकीत अनेक घटकांनी सहभाग घेतला. पंतप्रधान मोदी यांच्यावर मतदारांनी दाखवलेला विश्वास हा लोकसभा विजयातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, पतीत पावन संघटनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक, राष्ट्रवादी चे सर्व कार्यकर्ते, रिपाई आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते, लोकजनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते, अनेक सामाजिक संघटना या सर्वांचा वाटा या विजयात आहे. मुरलीधर मोहोळ यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला. ही व्यक्ती आपले प्रतिनिधित्त्व संसदेमध्ये करण्यास सक्षम आहे हा तो विश्वास होता. देवेंद्र फडणवीसांनी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

नेता कोण जो पराभवाची जबाबदारी घेतो, विजयाचे श्रेय कार्यकर्त्याला देतो. पुणे शहरातील लोकसभेचा विजय हा भारतीय जनता पक्षाचा विजय आहे. मोदींच्या सक्षम नेतृत्वाचा विजय आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या लोकप्रियतेचा विजय आहे. अमुक मतदारसंघात माझ्यामुळे मताधिक्य मिळाले हे सांगणे, त्याची सर्वत्र जाहिरात करणे, बॅनर लावणे हे हास्यास्पद आहे. 

स्व. वसंतराव भागवतांचे, स्व. रामभाऊ म्हाळगी यांचे ( ज्यांच्या नावाच्या प्रबोधिनीत आम्ही कार्यकर्ते शिक्षण घेतो) स्व. गिरीश बापटांचे हे संस्कार नाहीत. कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे. मूळ आहे. स्वतःच्या नावाची टिमकी वाजवून आपण त्या कार्यकर्त्याला अपमानित करतो आहोत, आपल्याच पायावर कुऱ्हाड मारतो आहोत. अधिक स्पष्टवक्तेपणा हा राजकारणात घातक असतो असे स्व. गिरीश बापट मला सांगायचे. पण कधी कधी इलाज नसतो"

टॅग्स :girish bapatगिरीश बापटPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा