विमानतळ परिसरात गुंडावर खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:12 IST2021-04-04T04:12:27+5:302021-04-04T04:12:27+5:30

पुणे : विमानतळ येथील के़ के़ पार्क कॉर्नर परिसरात एका सराईत गुन्हेगारावर तीन ते चार जणांनी चॉपर व धारधार ...

Murderous attack on a gangster in the airport area | विमानतळ परिसरात गुंडावर खुनी हल्ला

विमानतळ परिसरात गुंडावर खुनी हल्ला

पुणे : विमानतळ येथील के़ के़ पार्क कॉर्नर परिसरात एका सराईत गुन्हेगारावर तीन ते चार जणांनी चॉपर व धारधार हत्यारांनी सपासप वार केले. सुमित जगताप (वय ३२) असे या गुंडाचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, सुमित जगताप हा के. के. मार्केट येथील एका मिठाईच्या दुकानात आला होता. तेथे त्याचा काही जणांबरोबर वाद सुरु झाला. त्यातून एक महिला व दोन पुरुषांनी त्याच्यावर हल्ला केला. सुमित हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी ३ गुन्हे दाखल आहे.

सुमित याचे दोन विवाह झाल्याचे समजते. सध्या तो दुसर्‍या पत्नीबरोबर राहतो. त्याची पहिली पत्नी व तिच्या कुटुंबियांबरोबर वाद आहेत. त्यातूनच हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Murderous attack on a gangster in the airport area