शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दगडाने ठेचून बांधकाम कामगाराचा खून ; वाघोली परिसरातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 19:51 IST

कामगाराच्या डोक्यावर, तोंडावर आणि डोळ्यावर दगडाने मारहाण केल्याच्या खुणा

पुणे : वाघोलीजवळील आव्हाळवाडी परिसरात दगडाने ठेचून एका कामगाराचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विष्णु सुनिल दास (वय ४०, रा. गणेशनगर, वाघोली, मूळ कलकत्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस पाटील उमेश बबन आव्हाळे (वय ३९, रा. आव्हाळवाडी) यांनी लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ ते बुधवारी दुपारी ३ पर्यंतच्या कालावधीत घडली आहे. 

विष्णु दास हा त्याच्या पत्नीसोबत वाघोली येथील गणेशनगर वास्तव्यास होता. दोघेही बांधकाम मजूर म्हणून काम करतात. मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दास हा येथील बाजारात गेला होता. त्यावेळी त्याचा काही लोकांसमवेत वाद झाल्याचे समजते. आव्हाळवाडी येथील राजेश घुले यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर, तोंडावर आणि डोळ्यावर दगडाने मारहाण केल्याच्या खुणा आहेत. 

या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले़ आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :wagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसLabourकामगार