The murder of senior citizen in Medad near Baramati | बारामती जवळील मेडद येथे वृद्धाचा कोयत्याने वार करून खून 
बारामती जवळील मेडद येथे वृद्धाचा कोयत्याने वार करून खून 

बारामती : बारामती शहरालागतच्या मेडद गावात व्रूद्धाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.सोमवारी ( दि 3)रात्री ही घटना घडली. जगन्नाथ एकनाथ गावडे ( वय ६५) असे खून झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भावकीच्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले. त्यात कोयत्याने हल्ला करण्यात आल्याने जगन्नाथ गावडे यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे

.याबाबत अद्यापपर्यंत पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही . गावडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे . मात्र,आरोपीना अटक करा. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका गावडे कुटूंबियानी घेतली आहे .त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे ..


Web Title: The murder of senior citizen in Medad near Baramati
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.