किवळे येथे एकाचा खून, आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:14 IST2021-09-14T04:14:20+5:302021-09-14T04:14:20+5:30
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: चंद्रकांत सुदाम शिवले (वय ३६, व्यवसाय शेती रा. किवळे, ता. खेड) व ...

किवळे येथे एकाचा खून, आरोपीला अटक
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: चंद्रकांत सुदाम शिवले (वय ३६, व्यवसाय शेती रा. किवळे, ता. खेड) व मयत रमजान शेख तसेच आरोपी रफिक शेख हे दि. ११ रोजी दुपारी पाच वाजता शिवले याच्या मोटारसायकलवर ट्रिपलसीट चांदूस येथे जात होते. पाईट ते शिरोली रस्त्यावर एका पोल्ट्रीफार्म दरम्यान रमजान शेख व रफिक मुलाणी यांच्या हॉटेलमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून रफिक मुलाणी याने धारदार हत्याराने रमजान शेख यांच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. गळ्याला गंभीर जखम होऊन रमजान शेख यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, रफिक मुलाणी यांने चालत्या मोटरसायकलवरून उडी मारून पळून काढला होता. या घटनेबाबत चंद्रकांत सुदाम शिवले यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत रमजान शेख हा कुरकुंडी किवळे (ता. खेड) या परिसरात कोतवाल म्हणून कार्यरत होता.रफिक हा या घटनेनंतर फरार झाला होता.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुलाणी याला अटक केली आहे.