हरवलेल्या अडीच वर्षे वयाच्या मुलीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:17 IST2021-02-17T04:17:16+5:302021-02-17T04:17:16+5:30

पानशेत : कुरण बुद्रुक (ता. वेल्हे) येथून हरवलेल्या अडीच वर्षे वयाच्या मुलीचा मृतदेह मालखेड थोपटेवाडी रस्त्यावर मालखेड ...

Murder of a missing two and a half year old girl | हरवलेल्या अडीच वर्षे वयाच्या मुलीचा खून

हरवलेल्या अडीच वर्षे वयाच्या मुलीचा खून

पानशेत : कुरण बुद्रुक (ता. वेल्हे) येथून हरवलेल्या अडीच वर्षे वयाच्या मुलीचा मृतदेह मालखेड थोपटेवाडी रस्त्यावर मालखेड हद्दीतील पुलाखाली मंगळवारी सापडला. सोमवारी दुपारपासून ती बेपत्ता होती. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गौरी अक्षय मोरे असे मृत मुलीचे नाव आहे. सोमवारी दुपारी घराच्या परिसरात खेळत असताना एका पुरुषाबरोबर ती गेल्याची पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने गौरीला मालखेडपर्यंत रिक्षाने आणले. तेथून तो थोपटेवाडी मार्गाने गेल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.

पोलिसांना माहिती कळाल्यानंतर हवेली पोलीस आणि वेल्हे पोलिसांनी मुलीचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. अंधार पडल्यानंतर शोध थांबवण्यात आला. सकाळी शीघ्र कृती दलाच्या जवानांनी मिळलेल्या माहितीच्या मालखेड थोपटेवाडी रस्त्यावर आणि परिसरात कसून शोध घेतला. चार किमी परिसरातील डोंगरदऱ्या जवानांनी पिंजून काढला. प्रथम मुलीचे जर्किन मिळाले. नंतर जवळच थोपटेवाडी रस्त्यावर पुलाखाली तिचा मृतदेह मिळाला.

चौकट

शिबाने घेतला माग

पुणे पोलीस दलातील श्वान (ट्रॅकर डॉग) शिबाने मृतदेहापासून आरोपीचा मार्ग दाखवला. घटनास्थळापासून परिसरातील शेत शिवारात आरोपी फिरल्याचा मार्ग शिबाने दाखवला. त्यावरून आरोपी स्थानिक असल्याने त्याला परिसराची माहिती आहे. तो घटनेनंतर तीन-चार किमी फिरला असावा. आरोपीने मुलीला घेऊन रिक्षातून प्रवास केल्याची माहिती पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलीस आरोपीचा लवकरच शोध घेतील, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

Web Title: Murder of a missing two and a half year old girl