शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: मंचर येथे दगडी कडप्पा डोक्यात घालून एकाचा खून; आरोपीचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 16:04 IST

लाकडी काठीने मारहाण करून तसेच दगडी कडप्पा डोक्यात घालून मंचर येथे एकाचा खून करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे मंचर पोलिसांकडून खून करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु

मंचर : लाकडी काठीने मारहाण करून तसेच दगडी कडप्पा डोक्यात घालून मंचर येथे एकाचा खून करण्यात आला आहे. बाळू राधु पारधी (वय 50 रा. वाळुंजवाडी ठाकरवाडी ता. आंबेगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळुंजवाडी ठाकरवाडी येथे बाळू राजू पारधी हे मुले संदेश, विशाल, सुन स्वाती व नातू प्रसाद यांच्याबरोबर एकत्र राहतात. बाळू पारधी हे आसपासच्या परिसरात मोलमजुरी करत होते. तसेच त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते. गुरुवारी सायंकाळी बाळू पारधी हे कामाला चाललो आहे. असे सांगून घरातून निघून गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही. ते मुलगी रीना खंडागळे हिच्याकडे गेले असतील. असे समजून कुटुंबीयांनी शोध घेतला नाही.

गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंचर शहराच्या हद्दीतील मंचर घोडेगाव रस्त्यालगत असणार्‍या बिस्मिल्लाह दर्ग्याजवळ संजय जिजाभाऊ पारधी यांना बाळू पारधी हे दारू पिऊन पडलेले दिसले होते. रस्त्याने वाहनातून जात असताना यांनी पारधी यांना पाहिले होते. आज सकाळी कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. सकाळी मंचर घोडेगाव रस्त्यालगत बिस्मिल्ला दर्ग्याजवळ असणाऱ्या कब्रस्तानच्या गेटच्या आतमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.

रात्री अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी लाकडी काठी आणि दगडी कडप्पाने मारहाण करून बाळू राजू पारधी यांचा खून केला आहे. घटनास्थळी दगडी कडप्पा व लाकडी काठी मिळून आली आहे. पारधी यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी ते उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे. संदेश बाळू पारधी यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मंचर पोलीस खून करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश होडगर करत आहे.

टॅग्स :MancharमंचरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक