शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

Pune | केळी फेकून दिली म्हणून वीट डोक्यात मारून खून; आरोपीला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 11:55 IST

वीट डोक्यात मारून खून करणाऱ्याला जन्मठेप..

पुणे : केळी फेकून दिल्यासारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात वीट डोक्यात मारून खून करणाऱ्याला जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

सुभाष धर्मा पवार (वय ४९, रा. थेरगाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सुभाष वाघमारे यांचा खून झाल्याप्रकरणी मुलगा किशोर याने वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. सहायक पोलिस निरीक्षक टी. एस. भोगम यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी डी. एस. पांडुळे आणि पोलिस नाईक अरुण कोल्हे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. ही घटना २८ सप्टेंबर २०१७ रोजी थेरगाव येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली.

मृत वाघमारे, त्यांचे मित्र बाळू अडागळे आणि आरोपी पवार बोलत होते. त्यावेळी अडागळे याने आईसाठी आणलेली केळी वाघमारे यांनी फेकून दिली. त्यामुळे वाघमारे आणि अडागळे यांच्यात वाद झाले. यामध्ये किरकोळ मार लागल्याने अडागळे निघून गेला. त्यानंतर पवार याने अडागळेची केळी का फेकून दिली म्हणत वीट डोक्यात घालून वाघमारे यांचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ॲड. नामदेव तरळगट्टी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा आदेश दिला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयDeathमृत्यूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड