शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या दुचाकीवर चुलत भावानंच केला गळा कापून खून; पुण्याच्या राजगुरूनगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 12:21 IST

आरोपी चालत्या मोटरसायकल वरून उडी मारून पळून गेला

ठळक मुद्देगळ्याला गंभीर जखमी झाल्यानं जागीच मृत्यू

राजगुरुनगर : हॉटेलमध्ये झालेल्या बाचाबाची कारणावरून धारदार शस्त्रानं चुलत भावानंच चालत्या दुचाकीवर गळा कापून खुन केल्याची धक्कादायक घटना किवळे (ता खेड ) येथे घडली आहे. रमजान आदम भाई शेख रा.किवळे (ता खेड )असे खून झालेल्याचं नाव आहे. आरोपी रफिक पमा शेख रा.आहिरे (ता खेड ) यांच्याविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत सुदाम शिवले  (वय ३६ ) व्यवसाय शेती (रा. किवळे, ता खेड ) व रमजान शेख तसेच आरोपी रफिक शेख हे ११ तारखेला दुपारी पाच वाजता शिवले याच्या मोटारसायकलवर ट्रिपल सीट चांदूस येथे जात होते. पाईट ते शिरोली रस्त्यावर एका पोल्ट्री फार्म दरम्यान रमजान शेख व रफिक शेख यांचे हॉटेलमध्ये झालेल्या बाचाबाचीचे कारणावरून रफिक शेख याने धारदार हत्याराने रमजान शेख यांचे गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले.

गळ्याला गंभीर जखम झाल्याने रमजान शेख यांचा जागीच मुत्यू झाला. दरम्यान रफिक शेख चालत्या मोटरसायकल वरून उडी मारून पळून गेला. या घटनेबाबत चंद्रकांत सुदाम शिवले यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रफिक शेख हा फरार झाला असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल लाड करित आहे.

टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू