राजगुरूनगर: चास (ता. खेड ) येथे राहत्या घरात २४ वर्षीय युवकाच्या तोंडात बोळा कोंबुन दोन्ही हात बांधून गळफास देत त्याचा खुन करण्यात आल्याची घटना घडली आहे. योगेश ईश्वर वाघमारे रा. चास (ता खेड ) असे खुन झाल्याचे युवकाचे नाव आहे. याबाबत मयत योगेशची बहीण योगिता गौरव जैद (रा. जैदवाडी ता.खेड) हिने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत योगेश वाघमारे यांचा मका व्यापारीचा व्यवसाय होता.शनिवारी (दि १८) सकाळी राहत्या घरी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याच्या तोडांत कापडाचा बोळा कोंबत व त्याचे दोन्ही हात दंडाजवळ वायरने बांधुन घराच्या छताला दोरीने गळफास देत त्याचा खुन केल्याचे उघडकीस आले होते. तसेच मयत योगेश वाघमारे हा एकटा राहत होता. त्याचा बेबीकॉर्न मक्याचा व्यवसाय होता. त्यांचा व्यवसाय तेजीत होता. यातील पैशांच्या वादातून हा खून झाला असल्याची शक्यता आहे....................................................
राजगुरुनगर येथे मका व्यावसयिकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 19:18 IST
अज्ञात व्यक्तीने तोडांत कापडाचा बोळा कोंबत व दोन्ही हात वायरने बांधुन घराच्या छताला गळफास देत त्याचा खुन केल्याचे समोर आले आहे.
राजगुरुनगर येथे मका व्यावसयिकाचा खून
ठळक मुद्देपैशांच्या वादातून हा खून झाला असल्याची शक्यता