शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातल्या पर्वती पायथ्याजवळ १७ वर्षीय मुलाचा खून! भाच्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मामाने रचला होता कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 20:26 IST

दत्तवाडी पोलिसांकडून सहा जण अटकेत, मुलाला जुना मोबाईल विक्री करण्याचा बहाणा करुन रविवारी रात्री पर्वती पायथा येथे बोलावून घेतले

ठळक मुद्देमुलावर कोयत्याने वार करत असताना जमलेल्या लोकानाही इथून निघून जा नाही तर तुम्हालाही मारुन टाकू अशी धमकी दिली

पुणे : आंबेगाव पठार येथे झालेल्या आपल्या भाच्याचा खुनाचा बदला घेण्यासाठी मामाने एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. पर्वती पायथा येथे रविवारी रात्री झालेल्या खुनाचे प्रकरण दत्तवाडी पोलिसांनी उघडकीस आणले असून त्यात सहा जणांना अटक केली आहे. 

सौरभ विनोद वीर ऊर्फ मोन्या, वृषभ दत्तात्रय रेणुसे, सचिन ऊर्फ दादा पवार यांच्यासह तीन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे.   अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सौरभ वाघमारे (वय १७, रा. जनता वसाहत) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी दादासो मारुती बनसोडे (वय २३, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. 

सौरभ वाघमारे याने आंबेगाव पठार येथे एप्रिल महिन्यात संग्राम लेकावळे याचा खून केला होता. त्यानंतर सौरभ हा आंबेगाव पठार सोडून जनता वसाहतीत राहायला आला होता. संग्राम लेकावळे याचा मामा वृषथ रेणुसे याने इतरांच्या मदतीने वाघमारे याच्या खुनाचा कट रचला. सौरभ याला जुना मोबाईल विक्री करण्याचा बहाणा करुन रविवारी रात्री पर्वती पायथा येथे बोलावून घेतले. त्यानुसार सौरभ हा बनसोडे याला घेऊन पर्वती पायथा येथे आला. तो पायर्‍यांवर थांबला असताना तेथे दबा धरुन बसलेले सौरभ वीर, अक्षय वीर व वृषभ रेणुसे यांनी त्यांच्याकडील कोयत्याने सौरभ वाघमारे याच्या डोक्यावर, पाठीवर व हातावर वार केले. इतरांनी सौरभला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बनसोडे हा त्याला वाचविण्यासाठी सौरभला मारु नका, तो मरेल, असे ओरडत असताना सौरभ वीर याने त्याच्या पाठीवर कोयत्याने वार केला तर, स्वामी कांबळे याने त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. 

हा प्रकार सुरु असताना लोकांची गर्दी जमली. तेव्हा आरोपींनी नागरिकांना इथून निघून जा नाही तर तुम्हालाही मारुन टाकू अशी धमकी दिली. सौरभ वाघमारे हा रक्ताच्या थारोळ्यात पायर्‍यावरच पडल्यानंतर हे टोळके निघून गेले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर रात्रीत पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यापैकी ६ जणांना अटक केली असल्याचे दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता इंदलकर यांनी सांगितले. 

खुनाचा बदला खुन

सौरी वाघमारे आणि संग्राम लेकावळे हे दोघेही आंबेगाव पठार येथे रहात होते़. सौरभ हा लहान असल्याने लेकावळे हा त्याला किरकोळ कामे सांगत असे. येता जाता त्याची चेष्टा करुन सौरभच्या डोक्यात टपली मारणे. असा प्रकार करीत होता. त्याचा राग आल्याने सौरभने साथीदारांच्या मदतीने एप्रिल महिन्यात लेकावळे याचा खून केला होता. या प्रकरणानंतर सौरभ वाघमारे हा जनता वसाहतीत राहायला आला होता. संग्राम लेकावळे याचा मामा वृषभ रेणुसे याने भाच्याचा खूनाचा बदला घेण्यासाठी कट रचून सौरभ वाघमारे याचा खुन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

टॅग्स :Puneपुणेparvati-acपर्वतीPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी