शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

मुरलीधर मोहोळ यांची संवेदनशीलता; थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला शस्त्रक्रियेसाठी मायदेशी आणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:50 IST

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमची सर्व यंत्रणा कामाला लावली अन् विमानातून मायदेशी आणले

किरण शिंदे 

पुणे: भोसरी येथे राहणारी दोन दाम्पत्य पुण्याहून नुकतीच फुकेत येथे सहलीसाठी गेले. चौघेही फुकेतमधील कलीम बीचवरील अमरीतसर रेस्टॉरंटमध्ये राहत होते. मात्र सहलीच्या दुसऱ्याच दिवशी एका दाम्पत्याचा झोका खेळताना अपघात झाला आणि दोघेही गंभीररित्या जखमी झाले होते. ही माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना समजताच त्यांनी या दाम्पत्याच्या पुढील उपचारांसाठी भारतात आणण्याची सोय केली. मोहोळ यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे या दाम्पत्यावर पुण्यात यशस्वीपणे उपचार सुरू झाले आहेत.

घडलेल्या प्रकाराबाबत माहिती अशी की, फुकेत सहलीत संध्याकाळी दोनपैकी एक दांपत्य शुभम फुगे (वय २७ वर्षे) आणि त्यांची पत्नी सिद्धी (वय २१ वर्षे) हे दोघेही एकत्र झोका खेळत होते. खेळता खेळता झोका इतका उंच गेला, की त्या झोक्यावरुन ते दोघे सटकले आणि जवळजवळ १० फूट उंचीवरुन जोरात खाली आदळले. या अपघातानंतर त्यांना प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यांना ताबडतोब ‘पटाँग हॉस्पिटल’मध्ये दाखल केले गेले. शुभम यांचे मांडीचे हाड आणि सिद्धी यांचे मणक्याचे हाड मोडले. तेथे त्यांना फक्त पेन किलर गोळ्यांवर ठेवण्यात आले. ऑपरेशनसाठी त्यांना तत्काळ भारतात आणणे गरजेचे होते.

या संदर्भात केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, घडलेल्या प्रकाराची माहिती मला माझ्या एका कार्यकर्त्याकडून मिळाली आणि प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमची सर्व यंत्रणा कामाला लावली. विमानाच्या खुर्चीत बसून येणे दोघांनाही अशक्यप्राय होते, त्यामुळे दोन्ही जखमींना विमानात स्ट्रेचर अरेंजमेंटची गरज होती आणि त्यासाठी डॉक्टर्सपासून तर हवाई वाहतूक कंपन्यांपर्यंत खूपसाऱ्या परवानग्या लागत होत्या. या सगळ्या परवानग्या आणि विमानातल्या जागेची उपलब्धता यावर युद्धपातळीवर काम सुरू होते. कारण स्ट्रेचर ठेवण्यासाठी काही खुर्च्या काढाव्या लागणार होत्या, त्याचीही पूर्तता या सगळ्या करावी लागली’

ते पुढे म्हणाले, ‘परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासह माझ्या कार्यालयातील यंत्रणाही दाम्पत्याला परत आणण्यासाठी कार्यरत होती. शुभम आणि सिद्धी यांच्यासोबत असलेले दुसरे जोडपे अभिजीत पठारे आणि काजल मोरे यांनाही सोबतच लवकरात लवकर भारतात आणायचे होते. अखेर सर्व प्रयत्नांना यश येत त्यांना इंडिगो एयरलाइनच्या दोन वेगळ्या विमानाने त्यांना आणले. पुण्यात पोहोचल्यावर त्यांच्यावर पुण्यात संचेती रुग्णालयात त्यांना शस्त्रक्रियेसाठी दाखल केले.

गरजूंना मदतीचा हात देणे माझे कर्तव्यच : मोहोळ

परदेशात गेल्यावर अनेकांना विविध अडचणी येतात. असे प्रकार माझ्याकडे आल्यावर त्यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असते. म्हणूनच गरजूंना मदतीचा हात देणे, हे मी माझे कर्तव्य समजून सर्व यंत्रणा कामाला लावत असतो. अशा प्रकारांमध्ये आमच्या सरकारचे सर्व विभाग संवेदनशीलपणातून मदत करत असतात. त्याचा फायदा निश्चितच गरजूंना होत असतो.

टॅग्स :Puneपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळThailandथायलंडhospitalहॉस्पिटलairplaneविमानministerमंत्री