शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचा रिचार्ज संपला; अधिकाऱ्यांचे आउटगोइंग बंद, ११०० मोबाइल दोन तास बंद पडल्याने उडाला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:16 IST

ही सेवा पोस्टपेड असून, त्याचे बिल महापालिका भरते. कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्तीनंतर ते कार्ड स्वत:च्या नावावर करून ते वापरतात.

पुणे : महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाइलचे बिल न भरल्याने सोमवारी दुपारी सर्व ११०० मोबाइल नंबरचे आउटगाेइंग दोन तास बंद झाले होते. त्यातच महापालिकेत वेगवेगळ्या विभागांच्या बैठका असल्याने एकमेकांना निरोप देण्यात अडथळे निर्माण झाल्याने अधिकारीही चांगलेच संतापले होते.

महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एका खासगी मोबाइल कंपनीकडून ११०० मोबाइल नंबर घेतले आहेत. ही सेवा पोस्टपेड असून, त्याचे बिल महापालिका भरते. कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्तीनंतर ते कार्ड स्वत:च्या नावावर करून ते वापरतात.

महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जवळपास तीन ते साडेतीन हजार कार्ड आहेत. मागील दोन दिवसांपासून यातील अनेक मोबाइल क्रमांकावर बिल न भरल्याने आउटगोइंग आणि इंटरनेट सेवा बंद करण्याच्या सूचना येत होत्या. काही अधिकाऱ्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागास त्याची कल्पनाही दिली. मात्र, बिले भरली आहेत, असे सांगण्यात आले. मात्र, सोमवारी दुपारी १ नंतर अनेक अधिकाऱ्यांची सेवा बंद झाली. त्यानंतर तातडीने सर्वांनी ही माहिती संबंधित विभागास कळविली. त्यानंतर जवळपास दोन तासांनी सेवा पूर्ववत झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

महापालिकेची मोबाइलची कोणतीही बिले थकलेली नव्हती. संबंधित कंपनीची ही चूक आहे. त्यांना पालिकेकडून नोटीसही बजाविण्यात येणार असून, कंपनीकडे तक्रार केली जाणार आहे. - राहुल जगताप ( माहिती व तंत्रज्ञान अधिकारी )

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका