शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बोगदा खोदण्यासाठी पालिकेची महामेट्रोकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 22:04 IST

तळजाई टेकडीपासून सिंहगड रस्त्यासाठी बोगदा बनविण्याचे नियोजन

ठळक मुद्देतज्ज्ञ सल्लगाराच्या मदतीसाठी पाठविले पत्र

पुणे : तळजाई टेकडी ते सिंहगड रस्त्यादरम्यान बोगदा तयार करण्यासाठी, पुणे महापालिकेने महामेट्रोकडे मदत मागितली आहे़. पालिकेकडे असलेल्या तज्ज्ञ सल्लागारांमध्ये एकही बोगदा निर्मितीसाठी काम करणारा तज्ज्ञ नसल्याने बोगद्याच्या कार्य पूर्ततेसाठी पालिकेला महामेट्रोकडे धाव घ्यावी लागली आहे़. महापालिकेचे मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला यांनी याबाबत महामेट्रोला नुकतेच पत्र पाठविले आहे़. या पत्रात त्यांनी, पालिकेकडील सल्लागार समितीत बोगदा निर्मितीच्या कामासाठी आवश्यक तज्ज्ञ सल्लागार नसल्याचे सांगितले आहे़. परिणामी उपलब्ध सल्लागारांकडून बोगद्याच्या निर्मितीचे काम करणे शक्य नसल्याने, महामेट्रोने त्यांच्याकडील बोगद्याचे काम करण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ सल्लागारांची माहिती द्यावी अशी विनंती केली आहे़. वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील लोकसंख्या व वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने भेडसावत आहे़. त्यातच तळजाई परिसर ते सिंहगड रस्ता असा थेट रस्ता नसल्याने, नागरिकांना स्वारगेट किंवा कात्रज मार्गावरून सिंहगड परिसराकडे जावे लागते. यामुळे या रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीला येथे नित्याने सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून मनपाच्या विकास आराखड्यात तळजाई टेकडीपासून सिंहगड रस्त्यासाठी बोगदा बनविण्याचे नियोजन केले आहे़. या कामाची कार्यवाही सुरू करतानाच पालिकेला हा बोगदा कसा तयार करावा याकरिता तज्ज्ञाची गरज पडली असून, बोगदा तज्ज्ञ सल्लागारासाठी पालिकेला आता महामेट्रोचे दार ठोठविण्याची वेळ आली आहे़. चौकट -११ डिसेंबर २०१२ रोजी पालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेल्या प्रस्ताव क्रमांक १६०२ नुसार सल्लागारांच्या समितीला मान्यता देण्यात आली आहे़. त्यानुसार सल्लागार समिती नियुक्तही झाली. मात्र, यामध्ये बोगदा तज्ज्ञ सल्लागार नाही़ या समितीत केवळ केवळ रस्ते व पुलांच्या कामासाठीचेच तज्ज्ञ सल्लागार आहेत.  

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका