शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका महापालिका नाट्यगृहांना बसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 00:26 IST

स्वच्छता नसेल तर नाट्यगृहे खुली होऊन उपयोग काय ?

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या ऑनलाइन बैठकीत स्वच्छतेचा प्रश्न केला उपस्थित

पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका महापालिकेच्या नाट्यगृहांना बसणार आहे. नाट्यगृहांची स्वच्छता, पार्किंग, कँटीन याच्या निविदा संपुष्टात आल्या आहेत. याकरिता नवीन निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. मात्र  महापालिकेला निविदा प्रक्रिया राबविण्यास इतक्या महिन्यात मुहूर्तच मिळालेला नाही..आता आचारसंहितेमुळे  नाट्यगृहांच्या स्वच्छतेसाठी आणि देखभालीसाठी पालिकेला किमान एक महिना निविदा प्रक्रिया राबवता येणार नसल्याने नाट्यगृहे खुली होणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम नाट्यगृहांमध्ये करण्याची इच्छा बाळगणाऱ्या आयोजकांच्या पदरी निराशा पडणार आहे.    

महापालिकेला नाट्यगृहांची निविदा प्रक्रिया राबविण्यास मुहूर्त कधी लागणार? या आशयाचे वृत्त ' लोकमत' ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.. आठ महिने बंद असलेली नाट्यगृहे खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर पालिका प्रशासनाच्या परवानगीची अद्यापही प्रतीक्षा आहे. पालिकेने नाट्यगृहे खुली केल्यानंतर तेथे कार्यक्रम  आयोजित कसे करायचे हा प्रश्न आयोजकांससमोर  आहे.  आठ महिने नाट्यगृहे वापराविना असल्याने तेथील देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. याबद्दल कलाकारांनी आवाज उठवल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची तात्पुरती कामे करून घेण्यात आली. नाट्यगृहांचे निर्जंतुकीकरण तसेच सभागृह, मेकअप रूम, स्वच्छतागृहे यांची स्वच्छता, वाहनतळाची आणि मनुष्यबळाची व्यवस्था अशी कामे निविदा प्रक्रिया राबवल्याशिवाय करता येणार नाहीत. या कामांसाठी किमान एक महिना लागण्याची शक्यता असल्याने नाट्यगृहे खुली होणार का, याबाबत संभ्रम कायम आहे. स्वच्छतेअभावी पालिकेची नाट्यगृहे बंद राहिली तर नाट्यप्रयोग, लावणी कार्यक्रम आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केवळ खासगी सभागृहांचा आधार घ्यावा लागणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.--------------पालिकेने निविदा प्रक्रिया राबवावी, यासाठी सतत पत्रव्यवहार करत आहे. अधिकाऱ्यांची सतत बदली होत राहिल्याने हा मुद्दा बाजूला राहिला. नाट्यगृहांच्या परिसराची स्वच्छता केली जात असली तरी मूळ रंगमंदिराची डागडुजी, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना झालेल्या नाहीत. आचारसंहितेमुळे महिनाभर हे काम होणार नाही. स्वच्छता नसेल तर नाट्यगृहे खुली होऊन उपयोग काय ? प्रेक्षकांच्या आरोग्याची काळजी पण घ्यावी लागेल का नाही? आज मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या ऑनलाइन बैठकीत त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडण्यात आला आहे       - सुनील महाजन, अध्यक्ष, नाट्य परिषद, कोथरूड-----------आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया राबवता येणार नाही. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची कामे सतत केली जात आहेत. नाट्यगृहे सुस्थितीत आहेत. पालिकेने परवानगी दिल्यानंतर तयारी करून चार-पाच दिवसांत कार्यक्रम आयोजित करता येऊ शकतील.             - सुनील मते, रंगमंदिर व्यवस्थापक 

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकcorona virusकोरोना वायरस बातम्याcinemaसिनेमाUddhav Thackerayउद्धव ठाकरे