नगराध्यक्षांचे शक्तिप्रदर्शन

By Admin | Updated: February 6, 2016 01:44 IST2016-02-06T01:44:22+5:302016-02-06T01:44:22+5:30

नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी योगेश धनसिंग जगताप, उपनगराध्यक्षपदी ज्योती नवनाथ बल्लाळ यांची बिनविरोध निवड झाली

Municipal power demonstration | नगराध्यक्षांचे शक्तिप्रदर्शन

नगराध्यक्षांचे शक्तिप्रदर्शन

बारामती : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी योगेश धनसिंग जगताप, उपनगराध्यक्षपदी ज्योती नवनाथ बल्लाळ यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जाधव यांनी आज पालिकेच्या सभागृहात निवडीची घोषणा केली. निवडीनंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करत अध्यक्ष, उपाध्यक्षांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी काम पाहिले. बारामती नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. एकच नगरसेवक विरोधी आहे. सुभाष सोमाणी यांनी नगराध्यक्षपदाचा, रेश्मा यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने दोन्ही पदांच्या निवडी झाल्या. जगताप, बल्लाळ यांच्या नावावर पक्षनेते अजित पवार यांनी शिक्कामोर्तब केल्याने दोघांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्षपदाची आज निवड झाली. आगामी नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पदे देण्यात आली आहे. पाणीपुरवठ्यासह शहराच्या विविध विकासकामांचा वेग कायम राहण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन नियमात कामे करा, असा सल्ला या वेळी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी दिला. गटनेत्या भारती मुथा यांनी सांगितले की, पक्षनेत्यांनी दिलेल्या संधीचे सोने अध्यक्ष, उपाध्यक्षांनी करावे. मावळते नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदावर तरुण नगरसेवकांची वर्णी लागली आहे. निश्चितच त्यांच्याकडून बारामती नगरीचे चांगले काम होईल. पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर, नगरसेवक श्याम इंगळे, संजय लालबिगे यांची भाषणे झाली.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी सभागृहात शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यानंतर बारामती शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक दुपारी उशिरापर्यंत सुरू राहिली.

Web Title: Municipal power demonstration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.