शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक! काँग्रेसचे निरीक्षक सतेज पाटील सोमवारी पुण्यात; खांदेपालटाच्या चर्चेसही पुन्हा सुरूवात

By राजू इनामदार | Updated: June 7, 2025 16:11 IST

बदल व्हावा अशा इच्छेने कार्यरत झालेले पदाधिकारी, कार्यकर्तेही त्यामुळे थंड झाले, मात्र आता पुणे शहरात निरीक्षक येत असल्याने पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे

पुणे: काँग्रेसच्या प्रदेश समितीने पुणे शहरासाठी नियुक्त केलेले निरीक्षक सतेज पाटील सोमवारी (दि.९) पुण्यात येत आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ते भेट घेणार आहेत. महापालिका निवडणुकासंबधीचे प्राथमिक नियोजन करण्यासाठी ते येत असल्याचे समजते, मात्र त्यातून शहर पदाधिकाऱ्यांच्या खांदेपालटाच्या चर्चेस पुन्हा सुरूवात झाली आहे.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर लगेचच हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सर्व जिल्हा व शहरांसाठी निरीक्षक नियुक्त केले. त्यांना स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेऊन बदलासंबधी चर्चा करावी व तसा अहवाल द्यावा असे आदेश दिले. त्याप्रमाणे पुण्यासह राज्यात सर्वत्र निरीक्षकांचे दौरे, भेटीगाठी सुरू होत्या. काही जणांनी अध्यक्षपदासाठी तीन नावांसहचे अहवालही प्रदेश शाखेला सादर केले. मात्र दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंबधीचा आदेश आला. गेली काही वर्षे रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्यावा असा हा आदेश होता. त्यामुळे काँग्रेसची जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बदलाची सर्व प्रक्रियाच थंडावली.

बदल व्हावा अशा इच्छेने कार्यरत झालेले पदाधिकारी, कार्यकर्तेही त्यामुळे थंड झाले. मात्र आता पुणे शहरात निरीक्षक येत असल्याने पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे. सतेज पाटील यांच्या दौऱ्याची माहिती शहर शाखेकडूनच देण्यात आली आहे. त्यात पाटील दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत काँग्रेसभवनमध्ये भेटीसाठी उपलब्ध असतील असे म्हटले आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांकडून पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गटबाजीने शहर काँग्रेसला ग्रासले असून त्यातून पक्षाला बाहेर काढायचे असेल तर ताज्या दमाचा नवा तरूण शहराध्यक्ष महापालिका निवडणुकीआधी नियुक्त करणे गरजेचे असल्याचे मत पाटील यांच्याकडे व्यक्त करण्यात येणार असल्याचे समजते.

निवडणुकीच्या तोंडावर सहसा कोणत्याही राजकीय पक्षाकडून संघटनेत सहसा बदल केला जात नाही. विद्यमान शहराध्यक्ष अऱविंद शिंदे यांच्या समर्थकांना तसेच होईल असे वाटते आहे. खुद्द शिंदे यांनीही आपली ३ वर्षांची कारकिर्द प्रभारी म्हणूनच होती, त्यामुळे आता आपल्याला नियमीत नियुक्ती द्यावी असे मत पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केले असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते व त्यांचे समर्थक शांत आहेत.

शहरातील काँग्रेसच्या वर्चस्वाला मागील सलग तीन पंचवार्षिकमध्ये ओहोटीच लागली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शहरात सातत्याने अपयश येते आहे. महापालिका निवडणुकीतही चांगली कामगिरी करणे पक्षाला अशक्य झाले आहे. विसर्जीत महापालिकेत पक्षाचे फक्त ९ नगरसेवक होते. अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे तर काहींनी काम थांबवले आहे. पक्षाला संजीवनी मिळवून देण्याचे आव्हान त्यामुळे पक्षश्रेष्ठींपुढे आहे.

टॅग्स :PuneपुणेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेसPoliticsराजकारणMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी