शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक : ‘आरपीआय’ची सगळी मदार भाजपवर; जास्त जागांची मागणी, चिन्ह कमळच

By राजू इनामदार | Updated: June 15, 2025 15:05 IST

- पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सत्तेबरोबर म्हणजेच भाजपबरोबर राहायचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचा फायदा त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळते इतकाच होत आहे.

पुणे : ‘सत्तेबरोबर राहायचे’, या धोरणानुसार महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय, आठवले गट) पक्षाची सगळी मदार भारतीय जनता पक्षावर अवलंबून आहे. यावेळीही त्यांना भाजपच्याच कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल, असे दिसते. मागील वेळेपेक्षा जास्त जागा मागण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सत्तेबरोबर म्हणजेच भाजपबरोबर राहायचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचा फायदा त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळते इतकाच होत आहे. बाकी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद अशा प्रत्येक निवडणुकीत भाजपने आरपीआयच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आठवले यांनी विधानसभेला जागा मागितल्या, पण पक्षाने ना त्याची दखल घेतली, ना जागा वाटपाच्या किंवा कोणत्याही चर्चेत आरपीआयला सामावून घेतले. याचाच निषेध म्हणून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आठवले यांनी त्याची पर्वा न करता युती कायम ठेवली.

आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. भाजप तशीही वर्षभरापासून या निवडणुकीची तयारी करत आहे, मात्र आरपीआयचा, त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा त्यांच्याकडून विचारही केला जात नाही. युती असल्याने आरपीआयचे सगळे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्तेही भाजपला धरून राहतात. त्यातच आता महापालिका निवडणूक जवळ आल्याने त्यांची भाजप बरोबरची जवळीक वाढली आहे. पक्षाच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्याबरोबर प्राथमिक चर्चा केली असल्याचे समजते. तुम्ही स्वत: लक्ष घाला, चिन्ह त्यांचे असले तरी चालेल, मात्र मागील वेळेपेक्षा जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करा, असे या स्थानिक कार्यकर्त्यांनी आठवले यांना सांगितले आहे. त्यांनी तुम्ही तयारीला लागा, मी पाहतो काय करता येईल ते, असा सल्ला दिला असल्याचे समजते.

आरपीआयचे पारंपरिक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे स्वत:चे असे चिन्ह नाही. ते लक्षात घेऊ सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने त्यांना काही जागा दिल्या, मात्र भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल, अशी अट घातली. आठवले यांनीच ती मान्य केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांचा नाईलाज दिला. मिळालेल्या जागांपैकी काही जागांवर त्यांचे अर्ज बाद झाले, तिथे भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवली. तरीही, आरपीआयच्या अशा ५ जागा निवडून आल्या. भाजपने त्यांना ५ वर्षात ३ वेळा उपमहापौर पदाची संधी दिली, मात्र त्याशिवाय महापालिकेच्या सत्तेत कसलाही सहभाग दिला नाही.

स्थानिक पदाधिकाऱ्यांना भाजपच्या साथीने विधानसभेवर झेंडा फडकावण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळेच त्यांनी विधानसभेला किमान काही जागा द्याव्यात, अशी मागणी केली, मात्र त्याचा विचार झाला नाही. अखेर डॉ. धेंडे यांच्यासमवेत पक्षाची एक मोठी फळी पक्षाबाहेर गेली. आता तीच पळी महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन पुन्हा घरट्याकडे येण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. सत्तेबरोबर राहायचे हेच पक्षाचे धोरण झाल्याने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्याही आता ते पचनी पडले आहेत. त्यातही जास्ती जागा मिळाल्या तर त्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्याबरोबर आमची प्राथमिक चर्चा झाली आहे. काही जागा आम्ही निश्चित केल्या आहेत. जास्त जागा मिळाव्यात, आमचा सन्मान ठेवला जावा, भाजपच्या उमेदवाराला होईल ती मदत आम्हालाही व्हावी, सत्तेतील वाटा सन्मानपूर्वक चर्चा करून निश्चित करावा, अशा आमच्या मागण्या आहेत. पक्षाबाहेर पडलेले आमचे काही ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्तेही पक्षात परत यावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला नक्की यश येईल. - शैलेश चव्हाण, प्रभारी, आरपीआय पुणे शहर

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2024