शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

निवडणुकीसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 17:56 IST

प्रत्येक मतदान बूथवर प्रथमोपचार पेटी, गोळ्या, अ‍ॅन्टीसेप्टीक क्रीम, लोशन, ओआरएस, पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात आल्या आहेत

ठळक मुद्देप्रत्येक मतदार संघासाठी मदत-सहाय्य-कल्याण कक्षाची स्थापन मतदार संघांमधील पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये हे कक्ष सलग दोन दिवस 24 तास सुरु राहणार १०८ क्र मांकाच्या रुग्णवाहिकांचीही व्यवस्था

पुणे : लोकसभा निवडणुकांसाठी पुण्यामध्ये मंगळवारी मतदान होत आहे. या मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार तयारी केली आहे. शहरातील आठ विधानसभा मतदार संघांमधील मतदान केंद्रांसह पोलिंग बूथ वर प्राथमिक उपचारांसह रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. निवडणुकांसाठी सर्व मतदार केंद्रांवर आरोग्य विभागाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघासाठी मदत-सहाय्य-कल्याण कक्षाची स्थापन करण्यात आले आहेत. कोथरुड, पर्वती, लष्कर, हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, कसबा या विधानसभा मतदार संघांमधील पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये हे कक्ष सलग दोन दिवस 24 तास सुरु राहणार आहेत. या कक्षांमध्ये डॉक्टर्स, नर्स, फार्मासिस्ट, अटेंडंट नेमण्यात आले आहेत. यासोबतच प्रत्येक मतदान बूथवर प्रथमोपचार पेटी, गोळ्या, अ‍ॅन्टीसेप्टीक क्रीम, लोशन, ओआरएस, पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात आल्या आहेत. सर्व मतदार संघांमधील मतदान केंद्र प्रमुख, निवडणूक अधिकारी यांना आरोग्य विभागाने दिलेल्या हस्तपुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे. या हस्तपुस्तिकेमध्ये पालिकेच्या सर्व दवाखान्यांसह खासगी रुग्णालयांची माहिती, पत्ता आणि संपर्क क्रमांक दिले आहेत. यासोबतच शहरातील रुग्णवाहिकांचे क्रमांक, अडचणीच्या काळात आवश्यक असणारे मोबाईल आणि अन्य  क्रमांक देण्यात आले आहेत. ही हस्तपुस्तिका माहितीपूर्ण असल्यामुळे त्याचा तातडीच्या काळात उपयोग होणार आहे. ====आरोग्य विभागाने १०८ क्र मांकाच्या रुग्णवाहिकांचीही व्यवस्था केली आहे. यासोबतच प्रत्येक ठिकाणी एका रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेची एक रुग्णवाहिका डॉक्टर, नर्स आणि अत्यावश्यक साधनांसह सज्ज ठेवण्यात आली आहे. ====निवडणुकीच्या दिवशी अत्यावश्यक आरोग्य सुविधा देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सध्या उन्हाचे दिवस असल्याने मतदानासाठी आलेल्या नागरिकांनाही उन्हाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ओआरएस ठेवण्यात आलेले आहे. आवश्यक गोळ्या, औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. - डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpune-pcपुणेHealthआरोग्य