शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील धोकादायक इमारतींवर महापालिका कारवाई करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:36 IST

- आर्थिक परिस्थिती नसलेल्यांची राहण्याची व्यवस्था महापालिका करणार

पुणे : शहरात अतिधोकादायक स्वरूपाच्या २१ इमारती असून, यामध्ये इमारती आणि वाड्यांचाही समावेश आहे. या धोकादायक मिळकती पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका पाडणार असून, इतर ठिकाणी राहण्याची ज्यांची व्यवस्था नाही किंवा आर्थिक परिस्थिती नाही, त्यांची व्यवस्था पावसाळा संपेपर्यंत महापालिका करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

शहराच्या मध्यवस्तीत अनेक ठिकाणी जुने वाडे आणि इमारती आहेत. त्यांचे मालक व भाडेकरूंमध्ये वादविवाद असून, काही ठिकाणी मालकांमध्येही वाद आहेत. यातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी कोणीही राहत नाहीत. त्यांची देखभाल, दुरुस्तीही होत नाही. त्यामुळे हे जुने वाडे-इमारती अधिकच खिळखिळ्या होत आहेत. अशा इमारती पावसाळ्यात कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे महापालिकेकडून दरवर्षी अशा मिळकतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार या मिळकतींचे अतिधोकादायक, धोकादायक, कमी धोकादायक असे वर्गीकरण केले जाते. त्यात अतिधोकादायक इमारती अथवा वाडे उतरविले जातात. त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जातो.काही वेळा मिळकतधारकांकडून कारवाईला विरोध होतो. असे मिळकतधारक पालिकेच्या विरोधात न्यायालयात जातात. यात न्यायालयाने स्थगिती दिल्यास पालिकेला कारवाई थांबवावी लागते. जिथे दुरुस्ती शक्य आहे, तिथे तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या जातात. पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती झाली की नाही, याची पडताळणीही केली जाते.

अतिधोकादायक इमारती अथवा जुन्या वाड्यांना महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या (कलम १६० (ब) व (क)) अंतर्गत नोटीस बजावून या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या शहरात दररोज पाऊस पडत असल्याने अतिधोकादायक असलेल्या २१ मिळकतींवर महापालिका कारवाई करणार आहे. या मिळकतींमध्ये राहणाऱ्या ज्या नागरिकांची इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याची आर्थिक परिस्थिती नाही, अशा नागरिकांची पावसाळा संपेपर्यंतची व्यवस्था महापालिका करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड