शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पुणे महापालिका म्हणतेय, पुण्यात कुठेय वाहतूक कोंडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 12:13 IST

वाहतुक सुधारणेवर होतोय दरवर्षी कोट्यवधींचा खर्च 

ठळक मुद्दे वाहतूक कोंडीविषयक एका संस्थेच्या सर्वेक्षणात पुणे पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक कोंडीचे शहर ‘इज ऑफ लिव्हिंग परसेप्शन सर्व्हे’ च्या अंतर्गत नागरिकांना याविषयी मत नोंदविण्याचे आवाहन

पुणे : एकीकडे पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीस आलेला असताना महापालिका मात्र ‘ट्रॅफिकची समस्या नाही, पुण्यात प्रवास आनंददायी’ अशी जाहिरातबाजी करीत आहे. वाहतूक कोंडीविषयक एका संस्थेच्या सर्वेक्षणात पुणे पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक कोंडीचे शहर ठरलेले असताना महापालिका मात्र शहरात वाहतूकीची समस्या नसल्याचा हास्यास्पद दावा करीत आहे. ‘इज ऑफ लिव्हिंग परसेप्शन सर्व्हे’ च्या अंतर्गत पालिकेने नागरिकांना याविषयी मत नोंदविण्याचे आवाहन केले आहे. लोकेशन टेक्नोलॉजीमधील तज्ञ असलेल्या टॉमटॉम या संस्थेने जगातील ५७ देशांमधील ४१६ शहरांच्या वाहतूक समस्येबाबत सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये बेंगलुरु प्रथम क्रमांकावर, मुंबई चौथ्या तर नवी दिल्ली आठव्या क्रमांकावर आहे. पुणे शहर सर्वाधिक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. शहरात सुरु जागोजाग सुरु असलेली खोदाई, मेट्रोचे काम, पालिकेच्या वाहनांची दुरवस्था, जागोजाग पीएमपी बस बंद पडून होत असलेली वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या अशा एक ना अनेक अडचणी वाहनचालकांसह नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. पादचाºयांना चालण्यासाठी पुरेसे आणि सलग पदपथ नाहीत. सायकल ट्रॅक आणि सायकल योजनेचा बोजवारा उडाला आहे. पालिकेने अद्यापही पार्किंग धोरणाची अंमलबजावणी केलेली नाही. खराब रस्ते, पायाभूत सुविधांचा अभाव अशा कित्येक समस्यांवर अद्यापही तोडगा काढणे शक्य झालेले नाही. कोट्यवधींचा खर्च करुनही शहरातील वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले आहे. पालिका मात्र, शहरात वाहतूक कोंडीची समस्या नसून पुण्यातला प्रवास आनंददायी असल्याची प्रसिध्दी करीत आहे. पालिकेच्या या दाव्यावर टीका होऊ लागली आहे.======  ‘इज आॅफ लिव्हिंग परसेप्शन सर्वे’मध्ये शहरात वाहतूक कोंडी नसल्याचा करण्यात आलेला पालिकेचा दावा हास्यास्पद आहे. एकीकडे कोंडीत जीव गुदमरत असताना पालिकेने असा दावा करणे म्हणजे आंधळ्या कारभाराचा नमुना आहे. ज्याच्या सुपिक डोक्यातून ही कल्पना आली असेल त्याचा शनिवार वाड्यावर जाहिर सत्कार करायला हवा. हा जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार आहे. - विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच======पालिका केवळ स्वप्न रंजन करते आहे. हे लिहिणारी व्यक्ती पुण्यात राहते की युरोपात? यापेक्षा दुसरा विनोद असू शकत नाही. वाहतूक समस्या हा गंभीर विषय आहे. पालिकेकडे प्लॅन खूप असतात, त्यासाठी सल्लागार नेमले जातात. त्यांच्यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. त्यांच्याकडून घेतलेल्या प्रस्तावांवर अंमलबजावणी करीत नाहीत. पालिकेला आजवर मिळालेली बक्षिसे ही केवळ देखावे तयार करुन मिळाली आहेत. त्यावरच अधिकारी समाधानी असतात. पदाधिकारी आणि अधिकारी वस्तुस्थितीपासून दुरावल्याचे हे उदाहरण आहे. पुण्यात वाहतूक कोंडी नाही म्हणणे म्हणजे पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. सर्वेक्षणापेक्षा लोकांना दैनंदिन आयुष्यात अनुभव काय येतो हे महत्वाचं आहे.- प्रशांत इनामदार, पेडेस्ट्रियन फर्स्ट

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तMayorमहापौर