शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा आठ वर्षांपासून आर्थिक लेखाजोखा अहवालच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 14:19 IST

आर्थिक लेखाजोखा अहवाल न बघताच नगरसेवक सर्वसाधारण सभेत नवीन वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर कसा करतात, याकडेही लक्ष वेधले आहे़..

ठळक मुद्देपुणे महापालिकेने हे अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर तरी प्रसिद्ध करावेत, अशी मागणीप्रिंटिंग प्रेसवर कोणाचेच नियंत्रण नाही

पुणे : महापालिकेच्या कायद्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यावर महापालिकेचा वार्षिक लेखाजोखा अहवाल सादर करणे बंधनकारक असताना, आठ वर्षांपासून पुणे महापालिकेने तो सादरच केलेला नाही़. याकडे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे़.याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वेलणकर यांनी, पालिकेने कायद्याचे पालन करून हे अप्रकाशित लेखाजोखा अहवाल लवकरात लवकर प्रसिद्ध करावेत, तसेच पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत, अशी मागणी केली आहे़. वेलणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेने सदर अहवाल तयार करून तो स्थायी समितीच्या मान्यतेनंतर, तो छापून सर्व नगरसेवकांना घरपोच पाठविणे तसेच नागरिकांसाठी तो विक्री काऊंटरवर उपलब्ध करणे आवश्यक आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकातील जमाखर्ज व प्रत्यक्ष जमाखर्च यांची माहिती या लेखाजोखा अहवालातून कळत असते़. परंतु, माहिती अधिकारात हे अहवाल मागविले असता, पालिकेकडे सदर अहवालाचे शेवटचे छापील पुस्तक २०१०-११चेच असल्याचे समोर आले आहे़ तर, २०११-१२ ते २०१६-१७ पर्यंतचे अहवाल स्थायी समितीच्या मान्यतेनंतरही आजतागायत महापालिकेच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रिंटिंगसाठी पडून असल्याने, ते नागरिकांबरोबरच नगरसेवकांनाही मिळाले नसल्याचे पालिका प्रशासनानेच सांगितले आहे. याचबरोबर, २०१७-१८चा अहवालही अद्यापही अंतर्गत लेखापरीक्षकांकडे पडून असून, २०१९-१९चा अहवाल अजून महापालिकेच्या वित्त विभागाकडे तयार होत असल्याचे सांगण्यात आले आहे. .........प्रिंटिंग प्रेसवर कोणाचेच नियंत्रण नाहीपरिणामी, या सर्व प्रकारातून पालिकेचा भोंगळ कारभार समोर येत असून, पालिकेच्या प्रिंटिंग प्रेसवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे़. यामुळे स्मार्ट सिटी म्हणून मिरवणाऱ्या पुणे महापालिकेने हे अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर तरी प्रसिद्ध करावेत, अशी मागणी वेलणकर यांनी केली असून, आधीच्या वर्षीचा आर्थिक लेखाजोखा अहवाल न बघताच नगरसेवक सर्वसाधारण सभेत नवीन वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर कसा करतात, याकडेही लक्ष वेधले आहे़ 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाVivek Velankarविवेक वेलणकर