शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या ३३ अभ्यासिकांना कुलुप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 19:55 IST

शहरातील वस्तीपातळीवरील समाजमंदिरे, महापालिकेच्या शाळांचे हॉल,वर्ग खोल्या अभ्यासिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय महापालिकेच्या वतीने शहरामध्ये १४२ ठिकाणी अभ्यासिका बांधण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देशहरातील गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय    शहरातील गरीब व मागासवर्गीय ५ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी  महापालिकेच्या वतीने अभ्यासिका चालविल्या जातात.

पुणे: महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने शहरातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वर्ग चालविले जातात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डी.एस, बी.एड अथवा किमान पदवीधर असलेल्यांची नियुक्ती केली जाते. परंतु, शहरातील ३३ अभ्यासिका सध्या बंद असून, मार्गदर्शक मिळत नसल्याने या अभ्यासिकांना कुलूप लावण्यात आल्याचे समाज विकास अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या कारभारामुळे शहरातील हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.        शहरातील गरीब व मागासवर्गीय ५ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी  महापालिकेच्या वतीने अभ्यासिका चालविल्या जातात. शहरातील वस्तीपातळीवरील समाजमंदिरे, महापालिकेच्या शाळांचे हॉल,वर्ग खोल्या अभ्यासिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय महापालिकेच्या वतीने शहरामध्ये १४२ ठिकाणी अभ्यासिका बांधण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी शाळा सुरु होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर अभ्यासिका वर्ग घेण्यात येतात.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मासिक मानधनावर डी.एस, बी.एड अथवा किमान पदवीधर असलेल्यांची नियुक्ती केली जाते. सध्या केवळ १०९ अभ्यासिका सुरु आहेत. मात्र ,केवळ पात्र मार्गदर्शक मिळत नसल्याने शहरातील ३३ अभ्यासिकांना कुलूप लावल्या प्रकार समोर आले आहे. याबाबत नगरसेविका पल्लवी जावळे यांनी याबाबत लेखी प्रश्न विचारले होते. यावर प्रशासनाने उत्तर दिले असून,यामध्ये ही माहिती समोर आली आहे. वस्तीपातळीवर घरातली वातावरणामुळे अभ्यासासाठी अनेक अडचणी येतात. हुशार व होतकरु विद्यार्थ्यांची केवळ अभ्यासासाठी जागा नसल्याने अडचण होते. या गोष्टी लक्षात घेऊन महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने शहरातील गरीब व मासागवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शहराच्या विविध भागाता कोट्यवधी रुपये खर्च करून अभ्यासिका बांधल्या आहेत. परंतु,सध्या ऐन परीक्षांच्या हंगामात या अभ्यासिका बंद असल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीeducationशैक्षणिक