शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महापालिका अंदाजपत्रक : मागासवर्गीयांसाठी तरतूदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 03:35 IST

महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात नियमानुसार मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तीसाठी अपुरी तरतूद दाखवली आहे. नियमामुसार बांधील खर्च वगळता एकूण अंदाजपत्रकाच्या रकमेतील ५ टक्के रक्कम मागासवर्गीयांसाठी व ३ टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात अंदाजपत्रकातील तरतूद अपुरी असल्यामुळे सर्वपक्षीय मागासवर्गीय नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजीची भावना असून दिव्यांगांसाठी बोलणारे मात्र सभागृहात कोणीही नाही.

पुणे - महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात नियमानुसार मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तीसाठी अपुरी तरतूद दाखवली आहे. नियमामुसार बांधील खर्च वगळता एकूण अंदाजपत्रकाच्या रकमेतील ५ टक्के रक्कम मागासवर्गीयांसाठी व ३ टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात अंदाजपत्रकातील तरतूद अपुरी असल्यामुळे सर्वपक्षीय मागासवर्गीय नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजीची भावना असून दिव्यांगांसाठी बोलणारे मात्र सभागृहात कोणीही नाही.आयुक्तांनी ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यातील तब्बल १ हजार ६५० कोटी रुपये सेवकवर्गाचे वेतन, भत्ते यासाठीच खर्च होणार आहेत. १ हजार ६०२ कोटी रुपयांचा बांधील खर्च आहे. भांडवली खर्चासाठी २००१ कोटी रुपये आहेत. त्याच्या ५ टक्के मागासवर्गीयांसाठी म्हणजे १०० कोटी रुपये राखीव ठेवायला हवेत. तसेच दिव्यांगांसाठी ३ टक्के म्हणजे ६० कोटी रुपये राखीव ठेवले पाहिजेत. प्रत्यक्षात मात्र अंदाजपत्रकात इतकी तरतूदच करण्यात आलेली नाही.अंदाजपत्रकात फक्त ही तरतूद करून चालत नाही, तर त्यासाठीच्या योजनाही प्रस्तावित कराव्या लागतात. खर्च दाखवावा लागतो. कायद्यानेच ही गोष्ट प्रशासन व पदाधिकाºयांनाही बंधनकारक केलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत प्रशासन व पदाधिकाºयांकडून ही तरतूद पुरेशी केली जात नाही, अशी स्थिती आहे. मागासवर्गीय नगरसेवकांकडून त्याला हरकत घेतली जाते, त्यानंतर तरतूद वाढवली जाते, दाखवली जाते प्रत्यक्षात तो खर्च मात्र सरसकट सर्वांसाठी असलेल्या योजनांमध्ये केला जातो, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.सरसकट योजनांमध्ये मागासवर्गीयांचा समावेश दाखवून त्यातच ही रक्कम खर्च केली, असे दाखवले जात असल्याचे बहुसंख्य मागासवर्गीय नगरसेवकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना ही सर्वांसाठी खुली आहे, मात्र त्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त दाखवली जाते. रस्ते तयार केले जातात व ते रस्ते दलितवस्तीकडे जातात, त्यासाठी केले असे दाखवले जाते. याच प्रकारे वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांमध्ये मागासवर्गीयांचा समावेश दाखवून अंदाजपत्रकातील राखीव रक्कम खर्च केली जाते व कायद्याचे पालन केले असे दाखवले जाते.यावर्षी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रशासनाच्या या सवयीला जाहीरपणे तसेच पत्राद्वारेही हरकत घेतली आहे. स्थायी समितीत अंदाजपत्रक दुरुस्ती होईपर्यंत वाट पाहणार आहोत, तेथे दुरुस्ती होईल अशी अपेक्षा आहे, मात्र झाली नाही तर थेट सरकारकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी समितीलाही याबाबत पत्र दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. काँग्रेसचे अविनाश बागवे यांनीही मागासवर्गीय कल्याण समितीमध्ये हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे स्पष्ट केले. दरवर्षीच प्रशासन असा प्रकार करीत आहे. मागील वर्षीही आम्ही हरकत घेतली होती, त्यानंतर मुद्रणदोष दाखवून दुरुस्ती करण्यात आली, पण खर्च मात्र हवा तसाच करण्यात आला. यावर्षी अंदाजपत्रकावर लक्ष ठेवणार आहोत व मागासवर्गीयांसाठीच खर्च होईल, अशा योजनाही सुचवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.राखीव निधी हवा तसा खर्चमहापालिकेत मागासवर्गीय कल्याण समिती आहे. अतिरिक्त आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतात. सर्वपक्षीय मागासवर्गीय नगरसेवकांचा या समितीत समावेश असतो. या समितीनेही प्रत्येक वर्षी प्रशासन व पदाधिकाºयांच्या या सवयीवर हरकत घेतली आहे.मात्र नंतर प्रभागातील विकासकामे अडून राहू नयेत, पक्षाचा, पदाधिकाºयांचा रोष पदरी पडू नये, यासाठी तेही शांत होतात. त्याचाच फायदा उठवत प्रशासन राखीव निधी त्यांना हवा त्या प्रकारे खर्च करते व मागासवर्गीय, दिव्यांग व्यक्ती हक्काच्या लाभापासून वंचित राहतात.दिव्यांगाचे प्रतिनिधीत्व करणारे महापालिकेत कोणीही नाही. त्यांच्यासाठी मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ रॅम्प नाही, याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपाचा लाकडी, मंडपाचे कापड लावलेला रॅम्प बांधण्यात आला आहे. अंदाजपत्रकातील त्यांच्यासाठी हक्काच्या तरतुदीकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही. ही रक्कमही बसपास वगैरेसाठी खर्च दाखवली जात असते.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका