शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुंबई विद्यापीठाला जेतेपद, पश्चिम विभागीय महिला टेनिस स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 5:16 AM

मुंबई विद्यापीठ संघाने तीन सामन्यांत विजय नोंदवित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला टेनिस साखळी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला दोन विजयांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

पुणे : मुंबई विद्यापीठ संघाने तीन सामन्यांत विजय नोंदवित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला टेनिस साखळी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला दोन विजयांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या टेनिस कोर्टवर झालेल्या या स्पर्धेत मुंबई संघाने देवी अहिल्या विश्वविद्यालय (इंदूर), गुजरात विद्यापीठ (अहमदाबाद) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाचा पराभव केला. दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाच्या महिलांनी देवी अहिल्या विश्वविद्यालय आणि गुजरात विद्यापीठ संघाला नमविले. तसेच, देवी अहिल्या विश्वविद्यालय संघाला तृतीय क्रमांक व अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र झालेले हे संघ पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धा विशाखापट्टणम येथील गीतम विद्यापीठात ६ ते ८ जानेवारी २०१८ दरम्यान होणार आहेत.स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, नवी दिल्ली येथील भारतीय विश्वविद्यालय संघाच्या प्रतिनिधी डॉ. शालिनी मल्होत्रा, तसेच विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने आणि सहायक क्रीडा संचालक डॉ. दत्तात्रय महादम यांच्या हस्ते करण्यात आला.निकाल (साखळी सामने) :१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वि. वि. देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर (२-०) : १ ली एकेरी - प्रगती सोलनकर वि. वि. तुहीना चोप्रा (६-४, ६-४), २ री एकेरी- स्नेहल माने वि. वि. गणेशी अनिया (६-२, ६-१).२) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे वि. वि. गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद (२-१) १ ली एकेरी- प्रगती सोलनकर पराभूत वि. कोसंबी सिन्हा (६-४, ०-६, ४-६), २ री एकेरी- स्नेहल माने वि. वि. ऊर्मी पंड्या (६-४, ६-४) दुहेरी - स्नेहल माने व प्रगती सोलनकर वि. वि. कोसंबी सिन्हा व ऊर्मी पंड्या (६-०, ६-३).३) देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर वि. वि. गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद (२-१) १ ली एकेरी - गणेशी अनिया वि. वि. कोसंबी सिन्हा (६-१, ६-२), २ री एकेरी - तहीना चोप्रा पराभूत वि. ऊर्मी पंड्या (३-६, २-६), दुहेरी गणेशी अनिया व तहीना चोप्रा वि. वि. कोसंबी सिन्हा व ऊर्मी पंड्या (६-१, ४-६, १०-६).४) मुंबई विद्यापीठ, मुंबई वि. वि. देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर (२-०).१ ली एकेरी- परवीना शिवेकर वि. वि. गणेशी अनिया (६-१, ७-५), २ री एकेरी - दक्षता पटेल वि. वि. महिमा हार्दिया (६-०, ६-०).५) मुंबई विद्यापीठ, मुंबई वि. वि. गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद (२-०).१ ली एकेरी- परवीन शिवेकर वि. वि. कोसंबी सिन्हा (६-०, ६-१), २ री एकेरी- मिहिका यादव वि. वि. ऊर्मी पंड्या (६-२, ६-१).६) मुंबई विद्यापीठ, मुंबई वि. वि. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे (२-०).१ ली एकेरी- मिहिका यादव वि. वि. स्नेहल माने (६-२, ६-१), २ री एकेरी- परवीन शिवेकर वि. वि. प्रगती सोलनकर (६-४, ६-२).

टॅग्स :Puneपुणे