मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शिरगावजवळ कारने अज्ञात वाहनाला दिली धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 23:27 IST2017-09-28T23:27:39+5:302017-09-28T23:27:50+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शिरगावजवळ गुरुवारी रात्री आठच्या सुमारास कारने अज्ञात वाहनाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शिरगावजवळ कारने अज्ञात वाहनाला दिली धडक
तळेगाव दाभाडे/ कामशेत - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शिरगावजवळ गुरुवारी रात्री आठच्या सुमारास कारने अज्ञात वाहनाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले. एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मुंबईकडून पुण्याकडे जाणा-या मार्गिकेवर झालेल्या या अपघात हेमंत बाळकृष्ण तळेकर (वय २७, रा. नागांव, उरण, जि. रायगड), प्रफुल्ल बोहरी ( वय २५, रा. बिहार) आणि प्रिन्स राज ( वय १८, रा. बिहार) यांचा मृत्यू झाला. जखमीचे नाव समजू शकले नाही. शिरगावच्या पुलानजिक किलोमीटर क्रमांक ८९ जवळ झालेला हा अपघात एवढा भीषण होता की कारचा ( एमएच १४ सीके ९८६३) पुढचा भाग पुर्णपणे चेपला गेला.
घटनास्थळी देवदूत रुग्णवाहिका तातडीने दाखल झाली. उर्से टोल नाका महामार्ग सहाय्यक पोलीस उप निरीक्षक रमेश पोटे आणि सहकारीही पोहोचले. अधिक तपास तळेगांव दाभाडे पोलीस करीत आहेत.