शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

" मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्प देश हिताचाच,त्याला आमचा विरोध नाही, पण..."; राज्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 20:16 IST

मुंबई - हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनबाबत सध्या वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.

इंदापूर: मुंबई - हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. मात्र, काही शेतकऱ्यांकडून बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला आहे.मात्र, आता मुंबई- हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्प होणे देशाच्या हिताचं आहे. या प्रकल्पास आमचा विरोध नाही. परंतु, हा प्रकल्प अन्य मार्गाहून करणं शक्य असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करून तो पूर्ण करण्यात यावा अशी आमची मागणी केंद्र सरकारकडं करणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. 

मुंबई - हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनबाबत सध्या वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रस्तावित जागेबाबत ड्रोन सर्व्हे देखील झाला आहे. ही ट्रेन इंदापूर तालुक्यातील बागायती पट्ट्यातून जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेती उद्ध्वस्त होणार असल्याने शेतकऱ्यांचा याला विरोध होत आहे. त्यामुळे ही ट्रेन पर्यायी मार्गाने जावी अशी आपण केंद्राकडे मागणी करणार असल्याचे भरणे यांनी यावेळी सांगितले आहे. सध्या इंदापूर तालुक्यातील सणसर, भवानीनगर परिसरातून बुलेट ट्रेनच्या सर्व्हेचे काम सुरू आहे. यामध्ये तालुक्यातील बागायती जमीन हस्तांतर होणार असून शेकडो नागरिकांची राहती घरे मोडली जाणार आहेत. तसेच तालुक्यातील निरा डावा कालव्याला याचा धोका होणार आहे. साहजिकच या तालुक्यातील शेती अडचणीत येणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांकडून या प्रकल्पास विरोध होत आहे. त्यामुळे आपण माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून हा प्रकल्प अन्य पर्यायी मार्गाने पूर्ण करण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले.

केंद्राकडून सदर बुलेट ट्रेनबाबत वेगाने हालचाली होवून सर्व्हे करणारी टीम इंदापूर तालुक्यातील विविध भागात येवून गेली आहे. त्या टीमला शेतकऱ्यांनी थेट जाग्यावर चर्चा केली होती. त्याचवेळी शेकडो शेतकऱ्यांनी तत्काळ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करण्यास धाव घेतली होती. भरणे यांच्या निवासस्थानी जावून शेतकऱ्यांनी विविध अडचणी सांगून चर्चा केली होती.  

टॅग्स :IndapurइंदापूरBullet Trainबुलेट ट्रेनState Governmentराज्य सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदार