शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

टाटांच्या धरणातील अतिरिक्त दोन टीएमसी पाणीसाठ्याचा मुळशीकरांना मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 20:21 IST

जलसंपदा विभागाच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

ठळक मुद्देपुण्यातील विधानभवन सभागृहात बैठक

पुणे :  टाटांच्या मुळशी धरणाची उंची वाढवल्यानंतर साठणारे अतिरिक्त सुमारे दोन टीएमसी पाणी मुळशी तालुक्यातील शेतकरी आणि वाढत्या नागरीकरणाच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी (दि.25) रोजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय जलसंपदा विभागाच्या जिल्ह्यातील इतरही प्रलंबित कामांचा आढावा घेऊन तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देखील त्यांनी संबंधित अधिकारी यांना दिले. 

पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष            रणजीत शिवतरे , तसेच पाटबंधारे व  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, नीरा डावा कालव्यावरील वितरण प्रणालीचे विशेष दुरुस्ती प्रस्ताव तसेच शेटफळ तलाव धरण व कालव्याच्या कामाचे प्रस्ताव निधीसाठी राज्य शासनाकडे सादर करावेत. नीरा डावा मुख्य कालव्यातून होणारी पाणीगळती थांबविण्यासाठी या कालव्याच्या अस्तरीकरण व दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव तातडीने सादर करा. नीरा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या जीर्ण झालेल्या दगडी बांधकामांचे काँक्रेटीकरण करुन बांधकामे मजबूत करावीत, असे सांगून इंदापूर तालुक्यातील जुन्या शासकीय इमारती, कार्यालये व विश्रांतीगृहाच्या इमारतीच्या दुरुस्तीची कामेही हाती घ्यावीत, अशा सूचना करुन मुळशी धरण प्रकल्पातून नागरिकांना शेती, आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळण्यासाठी तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबविण्यासाठी सुर्वे समितीने लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.              भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळवून देण्यासाठी अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. भागाचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी पाटबंधारे विभागातील कामांच्या प्रश्नांबाबत तसेच विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारWaterपाणी