मुक्तिप्रभसुरीश्वर महाराज, अक्षयभद्र सुरीश्वर महाराजांसह ४० जैनमुनींचा मंचरप्रवेश उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 19:07 IST2017-12-12T19:03:29+5:302017-12-12T19:07:25+5:30
जैन धर्मगुरू आचार्य मुक्तिप्रभसुरीश्वरजी महाराज, आचार्य अक्षयभद्र सुरीश्वरजी महाराज व इतर ४० जैनधर्मीय साधू व साध्वींचा प्रवेश मंचर जैन संघातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मुक्तिप्रभसुरीश्वर महाराज, अक्षयभद्र सुरीश्वर महाराजांसह ४० जैनमुनींचा मंचरप्रवेश उत्साहात
मंचर : जैन धर्मगुरू आचार्य मुक्तिप्रभसुरीश्वरजी महाराज, आचार्य अक्षयभद्र सुरीश्वरजी महाराज व इतर ४० जैनधर्मीय साधू व साध्वींचा प्रवेश मंचर जैन संघातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मंचर येथे होणाऱ्या उपधान तप समारंभानिमित्त त्यांचे नुकतेच आगमन झाले. मिरवणूक पूजन प्रेस्टिज येथून सुरू होऊन शिवाजी चौक, चावडी चौकमार्गे आराधना भवन येथे सांगता झाली. मिरवणुकीत अग्रभागी देवेंद्र शहा, कुमारपाल समदडिया, प्रियेश गांधी, गोकुळ शहा, सुरेश पुंगलिया, प्रशांत चोरडिया, संदीप संचेती होते.
मुंबई येथील बुद्धिसागर बँड यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जुन्नर येथील जैन बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी अनेक कला सादर केल्या. मिरवणुकीमध्ये महिला व युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. मिरवणुकीत वंदे विरम, गुरुजी अमारा अंतर्नाद अमने आपो आशीर्वाद, महावीर स्वामी भगवान की जय, अशा घोषणा देण्यात आल्या. यानिमित्त सुमतीनाथ भगवान मंदिरामध्ये सामूहिक आरती व भक्तिभावना संध्याकाळी ठेवण्यात आली.