शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

महावितरणचा उद्योजकांना दरवाढीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 1:08 AM

नुकत्याच दिवाळीच्या मुहूर्तावर आलेल्या वीजबिलांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ३० ते ४० टक्के एवढी प्रचंड दरवाढ केली आहे.

बारामती : नुकत्याच दिवाळीच्या मुहूर्तावर आलेल्या वीजबिलांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ३० ते ४० टक्के एवढी प्रचंड दरवाढ केली आहे. दरवाढ करून उद्योजकांना वीजदेयक बिले दिलेली आहेत. वीज वितरण कंपनीने केवळ १० ते १२ टक्के दरवाढ करण्याचे घोषित केले होते. मात्र, ३० ते ४० टक्के दरवाढ झाल्याने उद्योग क्षेत्रात नाराजी पसरली आहे. त्यातच वीज कंपनीने चुकीच्या पद्धतीने पॉवर फॅक्टर आकारणी करून हजारो रुपयांचा दंड अनेक उद्योजकांना लावलेला आहे. त्यामुळे उद्योग-व्यवसाय मोडकळीस येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात केलेल्या वीजदरवाढीचा बारामती एमआयडीसीतील उद्योजकांनी एकत्र येत निषेध नोंदविला.बारामती चेंबर आॅफ कॉमर्स व इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता पडळकर यांची उद्योजकांनी नुकतीच भेट घेतली. अधीक्षक अभियंता दत्तात्रय पडळकर यांना उद्योजकांनी चुकीच्या पद्धतीने आकारलेला पॉवर फॅक्टर दंड कमी करण्याची मागणी केली. तसेच, आकारलेल्या वीजदरवाढीमुळे महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यातील स्वस्त वीज दरामुळे बाजारात स्पर्धेसाठी कमी पडतील. परिणामी, हे उद्योग धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे दरवाढीमध्ये काही प्रमाणात तरी सवलत द्यावी. चुकीची बिले दुरुस्त करुन मिळावी, अशी मागणी उद्योजकांनी केली. तसेच नवीन पॉवर फॅक्टर सूत्र अंमलबजावणीपूर्वी उद्योजकांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजने केली. यावेळी वीज वितरण कंपनीचे सहायक कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते, उद्योजक सचिन माने, पांडुरंग कांबळे, शहाजी रणवरे, कै लास शितोळे, भाऊसाहेब तुपे, आशिष पल्लोड, संजय थोरात, अरुण म्हसवडे, महावीर कुंभारकर, शफिक सय्यद, बाबासोा शेंडे, राजेंद्र साळुंके, नरेश तुपे, टेक्स्टाईल पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंकेश्वरकर, के बी गायकवाड,सुनील पाटील, कमलेश खेताम आदी उद्योजक उपस्थित होेते.>वीजदर जवळपास १० रुपये प्रतियुनिटवीज दरवाढीबाबत बारामती चेंबर आॅफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आॅटोमोबाईल उद्योग बऱ्यापैकी चाललेला असताना नुकत्याच झालेल्या या वीजदरवाढीमुळे मोडकळीस येण्याची भीती आहे. उद्योग क्षेत्रासाठी गुजरातमध्ये ६ रुपये २० पैसे प्रति युनिट, तर कर्नाटक मध्ये ७ रुपये ८० पैसे प्रतियुनिट वीज दर आहे.मात्र, या दरवाढीमुळे महाराष्ट्रात हाच वीजदर जवळपास १० रुपये प्रतियुनिट झाला आहे. मला साधारण १ लाख ४५ हजारांच्या आसपास येणारे वीजबिल १ लाख ८५ हजारांवर गेले आहे. यावरून वीजदरवाढीची तीव्रता लक्षात येते. तसेच पॉवर फॅ क्टर दंड आकारणी वीजबिलाएवढी करण्यात आल्याचे कुंभार यांनी सांगितले.अधीक्षक अभियंता पडळकर यांनी, चुकीचा पॉवर फॅ क्टर लावलेली सर्व बिले दुरुस्त केली जातील. तसेच, जादा रक मेच्या भरलेल्या बिलांना पुढील बिलांमध्ये वजावट मिळेल, असे आश्वासन दिले आहे. नवीन पॉवर फॅक्टरबाबत उद्योजकांचे १ दिवसाचे प्रशिक्षण लवकरच घेऊ. ३ महिने मुदतीच्या मागणीचा उद्योजकांना प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू, असे आश्वासनदेखील पडळकर यांनी दिल्याचे चेंबर आॅफ कॉमर्सच्या सूत्रांनी सांगितले.