शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

मुख्यमंत्री महोदय, राज्यात कोरोनाचा उद्रेक; 'एमपीएससी'ची परीक्षा पुढे ढकलावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 17:42 IST

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा; एमपीएससी समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

पिंपरी : राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) येत्या ११ एप्रिलला संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. समन्वय समितीने गेल्या आठवड्यात परिक्षार्थींचे मत आजमावले. टेलीग्रामवर मतही आजमविण्यात आले. यात सहभागी आठ हजार विद्यार्थ्यांपैकी ५१ टक्के जणांनी परीक्षा घेण्याच्या बाजूने मत दिले होते. मात्र जसजशी बधितांची संख्या वाढत आहे, तसतशी परीक्षा पुढे ढकलण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.राज्यासह देशभरात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना प्राणास मुकावे लागले आहे. पुण्यात अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी कोरोना लक्षणे असलेल्या व्यक्तिंच्या संपर्कात आले आहेत. काहींना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काही जण परीक्षेनंतर रुग्णालयात जाऊ असा विचार करीत आहेत. मध्यप्रदेश आणि बिहारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. राज्यातील बधितांची संख्या लक्षात घेता सरकारने आपला निर्णय जाहीर करवा. त्या नुसार विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येईल, अशी विनंती एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर, महेश घरबुडे, अरुण पाटील आणि विश्वंभर भोपळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.--//

परीक्षा पुढे ढकलण्याकडे वाढला कलएमपीएससी समन्वय समितीने टेलिग्रामवर विद्यार्थ्यांना संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी का? असा प्रश्न विचारला. या कल चाचणीत २७ हजार ९०७ विद्यार्थी सहभागी झाले. त्यातील ६२ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या बाजूने मत दिले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या