शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

MPSC Exam| संयुक्त पूर्व परीक्षेतील आणखी १७० मुलांना संधी; इतरांना मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:23 IST

आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे...

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) चुकीच्या कारभारामुळे राज्यातील जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. याविरोधात उच्च न्यायालयात गेलेल्या ८६ विद्यार्थ्यांना संयुक्त पूर्व परीक्षेतील मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले. त्यामुळे इतर चार ते पाच  हजार विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद  आणि नागपूर खंडपीठात गुरूवारी सुनावणी सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आणखी १६१ विद्यार्थ्यांना तर नागपूर खंडपीठाने ९ विद्यार्थ्यांना पात्र केले आहे. तर औरंगाबाद खंडपीठाचा निकाल येण्यास अद्याप वेळ आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अन्याया विरोधात युवासेना तसेच राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी आवाज उठवत मुंबई उच्च न्यायालय तसेच औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. 

... तर समान न्यायाच्या तत्वाचे उल्लंघन होऊ शकते८६ मुलांना विशेष न्याय देऊन संविधानातील समान न्यायाच्या तत्वाचे उल्लंघन होऊ शकते याची जाणीव असायला हवीच. त्यामुळे या ८६ उमेदवारांच्या याचिकेला प्रातिनिधिक स्वरूपाचे समजून आयोगाने सर्वांना न्याय देऊन संविधानाच्या समान संधी व न्यायाच्या तत्वाचे पालन करून या तरुणांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची संधी द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव तसेच आयोगाच्या सचिवांकडे युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कामाचा फटका राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसला  आहे. आयोगाने चौथी उत्तरतालिका जाहीर करावी. त्यामुळे पूर्ण निकाल बदलणार आहे.  अन्यथा पात्र असूनही हजारोंना याचा फटका बसणा आहे. याचा आयोगाने विचार करावा.- हनुमंत हिरवे, पात्र विद्यार्थी

संयुक्त पूर्व परीक्षेतील विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा असेल तर आयोगाने चौथी उत्तरतालिका जाहीर करावी. कारण आधीच्या तीन उत्तरतालिकेत बरोबर प्रश्नाला चुकीचे आणि चुकीच्या  प्रश्नांना बरोबर असा घोळ घातला आहे. त्यामुळे चौथी बरोबर उत्तरतालिका जाहीर करावी. त्यामधून पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. - सौरभ कोरडे, पात्रतेच्या प्रतिक्षेतील विद्यार्थी

आज मुबंई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठात याचिकेवर सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत मुंबई आणि नागपूरमधून एकूण १७० आणखी विद्यार्थ्यांना न्यायालयाने पात्र ठरवले आहे. संयुक्त परीक्षेती या विद्यार्थ्यांची २९ आणि ३० जानेवारी रोजी मुख्य परीक्षा होणार आहे. मात्र, दोन दिवसांत कोणत्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास होणार नाही. त्यामुळे आयोगाने परीक्षेची तारीख पुढे ढकलावी. तसेच चौथी उत्तरतालिका जाहीर करावी. तरच यातून हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. - तुकाराम हिरवे, पात्रतेच्या प्रतिक्षेतील विद्यार्थी

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाexamपरीक्षाEducationशिक्षण