शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार सुळे आणखी दोन पुरस्कारांनी सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 00:55 IST

दिल्ली येथील फेम इंडियाचा श्रेष्ठ सांसद तसेच युनिसेफ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थांच्या वतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंट्रीयन्स अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हे दोन पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आले.

बारामती - दिल्ली येथील फेम इंडियाचा श्रेष्ठ सांसद तसेच युनिसेफ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थांच्या वतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंट्रीयन्स अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हे दोन पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आले.दिल्ली येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते श्रेष्ठ सांसद तर ‘स्वनिती’च्या उमा भट्टाचार्य आणि युनीसेफच्या अमृता सिंग यांच्या उपस्थितीत पार्लमेंट्रीयन्स अवार्ड फॉर चिल्ड्रन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या मतदार संघात खासदारांनी केलेली कामे, संसदेतील उपस्थिती, संसदेत त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न, त्यांनी मांडलेली खासगी विधेयके, चर्चासत्रातील सहभाग अशा विविध मुद्द्यांवर फेम इंडिया या संस्थेच्या सर्व्हेक्षणातून निवडक खासदारांची निवड करण्यात आली.राज्यातील मुकबधीर मुले आणि अंगणवाड्या, आशा वर्कर्स तसेच शालेय शिक्षण आणि शिक्षकांसाठी सातत्याने सुळे या कार्यरत आहेत. स्टार्की फौंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, टाटा ट्रस्ट, तसेच पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मुकबधीर मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे बसविण्याचा कार्यक्रम त्या घेत असतात. नुकतेच त्यांनी पुण्यात घेतलेल्या या कार्यक्रमाची ‘गिनीज वर्ल्ड रेकोर्ड बुक’ने सुद्धा दखल घेतली. या कार्यक्रमात आठ तासांत तब्बल ४ हजार ८४६ जणांना श्रवणयंत्रे बसवून जागतिक विक्रम करण्यात आला.याबरोबरच त्या विद्यार्थिनींना आणि आशा वर्कर्स यांना गेल्या वर्षी पंधरा हजार सायकली वाटल्या. तर अंगणवाडीतील मुलांना स्वच्छ पाणी, वीज, सकस पोषण आहार आणि अन्य सुविधा देण्यासाठी त्या कार्यशील आहेत. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रापासून राज्य शिक्षण विभागापर्यंत त्यांचा पाठपुरावा सुरु असतो. या सर्व कामांची दखल घेत ‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थांच्या वतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंट्रीयन्स अ‍ॅवार्ड फॉर चिल्ड्रन’हा पुरस्कार सुळे यांना देण्यात आला.हा जनतेचा सन्मान : सुळेफेम इंडिया या संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट संसदीय कायार्साठी दिला जाणारा ‘श्रेष्ठ सांसद अवार्ड’ आणि युनिसेफचा ‘पार्लमेंट्रीयन्स अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हे पुरस्कार मला मिळाले. माझा मतदारसंघ आणि राज्यातील जनतेचा विश्वास यांच्या बळावर संसदेत मला त्यांचे प्रश्न मांडता आले. हा सन्मान माझ्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या तमाम जनतेचा आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरस्कार स्वीकारताना भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPuneपुणे