शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे टोकाचा विरोध अन् दुसरीकडे गळाभेट, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची भेट; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 08:26 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात  उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी असणार अशा चर्चा सुरू आहेत.

Supriya Sule ( Marathi News ) : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात  उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी असणार अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता दोन्ही गटाकडून प्रचार, गाठी भेटीला सुरुवातही झाली आहे. जाहीर सभांमधून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात टोकाचा विरोध सुरू असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे काल खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची एका मंदिरात भेट झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सुळे आणि पवार यांनी गळाभेट घेतल्याचेही दिसत आहे यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 

बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदीरात दर्शनासाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाचवेळी आल्या होत्या, त्यावेळी ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्यांदाच बारामती मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे, यामुळे या लढतीची जोरदार चर्चा सुरू आहे. 

राेहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची टाच; बारामती ॲग्राेची ५० कोटींची मालमत्ता जप्त 

काही दिवसापूर्वी खासदार सुनिल तटकरे यांनीही बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार असतील असं सांगितलं होतं. बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका सुरू आहेत, सुनेत्रा पवार यांनीही बारामती लोकसभा मतदार संघात गाठीभेटी वाढवल्या आहेत.

खासदार सुप्रिया सुळेंसाठी अजित पवारांचा पुतण्या मैदानात

 बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशीच लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मतदार संघात दोन्ही बाजूंनी प्रचारही सुरू झाला आहे. अजित पवार यांच्याविरोधात त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार मैदानात उतरल्याचे दिसत आहे.

युगेंद्र पवार यांनी बारामती मतदार संघातील गावांना भेटी वाढवल्या आहेत. कालही बारामती तालुक्यातील गावांना युगेंद्र पवार भेट देत होते. यावेळी त्यांनी मी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. गावभेटीवेळी युगेंद्र पवार म्हणाले, "बारामतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून काम करत आहे. मला वाटत आता शदर पवार यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं, आज बारामतीला ओळख ही शरद पवार यांच्यामुळे मिळाली आहे. आपण बाहेर गेल्यानंतर बारामतीचा आहे म्हटल्यावर लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतात, त्यामुळे आता आपल्याला शरद पवार यांना पाठिंबा देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार