'कोणी दादा, काका येवो' म्हणत संजय काकडे यांची फटकेबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 07:59 PM2020-01-29T19:59:26+5:302020-01-29T20:39:08+5:30

शहर भाजपच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. या कार्यक्रमात माजी आमदार जगदीश मुळीक यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

MP Sanjay Kakde political statement at Pune | 'कोणी दादा, काका येवो' म्हणत संजय काकडे यांची फटकेबाजी 

'कोणी दादा, काका येवो' म्हणत संजय काकडे यांची फटकेबाजी 

googlenewsNext

पुणे : राज्यातले सरकार हे अपघाती सरकार आहे.मात्र दिल्लीत भाजपची सत्ता आहे, शहरात भाजपची  सत्ता आहे, तेव्हा कुणीही चिंता करू नका. कुणी दादा, काका नाना मामा काही करू शकणार नाही अशा शब्दात राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी अप्रत्यक्षपणे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना आव्हान दिले. 

शहर भाजपच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. या कार्यक्रमात माजी आमदार जगदीश मुळीक यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ आदींसह विविध नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

पुढे ते म्हणाले, ' आपले ध्येय 2022 होणाऱ्या महापालिकेच्या निवडणूका आहेत. या निवडणुकीत सर्वांना एकत्र घेऊन 95 ते 100 नगरसेवक निवडून येतील. माझा कार्यकर्त्यांवर विश्वास असून पक्षाची पुनर्बांधणी करू असंही सांगायला ते विसरले नाहीत'. 

या कार्यक्रमात पाटील म्हणाले की, 'पक्षाच्या चांगल्या कामाला तडा देण्याचे काम काहीजण करत आहे.  राज्यातले सगळेजण एकत्र येऊन आपल्याला संपविण्याचे काम करत आहेत. पुण्यातदेखील एकजुटीने काम करण्याची गरज आहे. खासदार बापट, खासदारकाकडे आणि आमदार मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे चालवायचे आहे. 

Web Title: MP Sanjay Kakde political statement at Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.