शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: 9 दिवसांत खूप काही होऊ शकते; संभाजी राजे, मराठा आरक्षणावर अजित पवारांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 19:13 IST

Maratha Reservation ajit pawar talk: मराठा आरक्षणावरून काहींना त्यात राजकारण करायचे आहे, संभाजी राजेंना नाही....

पुणे : मराठा आरक्षण संदर्भात सगळं सुरळीत चाललेलं आहे. तुम्ही त्याला काही वेगळं वळण देऊ नका. संभाजी राजे यांनी ६ जून पर्यंतची मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासंबंधी मुदत दिली आहे.पण या तारखेला अद्यापही ९ दिवस अवकाश आहे. यादरम्यान नक्कीच चांगला निर्णय घेता येईल. मात्र, मराठा आरक्षणावरून काहींना त्यात राजकारणच करायचे आहे, संभाजी राजेंना नाही.अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला आहे. 

पुण्यात अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, माझी आणि संभाजीराजेंची भेट दारातच झाली. आम्ही एकमेकांना फक्त नमस्कार केला. पण राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधी पुढाकार घेवुन दिलीप भोसले जे अलाहाबाद हाय कोर्टाचे चीफ जस्टीस आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ते आता यावर काम करत आहेत. 

 

चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याचा समाचार... 

काही कारण नसताना काहीजण म्हणतात, आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. पण कसलं आंदोलन, आणि कशासाठी पाठिंबा? अशा शब्दात अजित पवारांनी चंद्रकांत पाटलाच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंब्याबाबतच्या वक्तव्याचा समाचार घेतला. परंतू नंतर आता दादांचं ऐकायलाच पाहिजे. कारण मी, राजेश टोपे आम्ही सगळे मराठा समाजातले आहोत, आम्हाला पण आता रस्त्यावर उतरायला पाहिजे असा शाब्दिक टोमणा देखील मारला. .   खासदार संभाजीराजेंनी दिला 'शिवराज्याभिषेक दिना' चा अल्टिमेटम... 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. "६ जून रोजी शिवाजी महाराज छत्रपती झाले. आज मी घोषणा करतोय. ६ जूनपर्यंत आमच्या पाच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ६ जूनपासून रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु, यावेळी आम्ही कोरोना बिरोना बघणार नाही", असा थेट इशाराच छत्रपती संभाजी राजेंनी दिला आहे.

संभाजी राजे यांनी यावेळी सरकारसमोर पाच महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. "मी मुख्यमंत्र्यांना बोललो, जे तुमच्या हातात आहे, ते तुम्ही करा. मी पाच गोष्टी काढल्या त्या पूर्ण व्हायला हव्यात. आज मराठा समाज माझ्यामुळे शांत आहे", असं संभाजी राजे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षणchandrakant patilचंद्रकांत पाटील