खासदार-आमदारांची कॅन्टोमेंटला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:19 IST2021-05-05T04:19:50+5:302021-05-05T04:19:50+5:30
देशासहित संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन व रुग्णवाहिकेची कमतरता जाणवत आहे. या गोष्टींच्या अभावाने रुग्ण आपल्या जिवाला मुकत असून ...

खासदार-आमदारांची कॅन्टोमेंटला मदत
देशासहित संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन व रुग्णवाहिकेची कमतरता जाणवत आहे. या गोष्टींच्या अभावाने रुग्ण आपल्या जिवाला मुकत असून पटेल रुग्णालयातही हीच स्थिती आहे. याविषयीच्या परिस्थितीची गंभीर दखल घेत स्थानिक आमदार व खासदार यांनी त्वरित आपल्या विकासनिधीतून, जिल्हा नियोजन समितीतून पटेल रुग्णालयाला त्वरित ऑक्सिजन प्लांट उभारणी, रुग्णवाहिका खरेदी,व रेमडीसीविर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने येथील नागरिक, रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या दररोज पटेल रुग्णालयातील अतिदक्षता विभाग व ऑक्सिजन बेड साठी अंदाचे २५० ते ३०० ऑक्सिजन सिलेंडर लागत असून, सिलेंडरची कमतरता असल्याने ते उपलब्ध करण्यासाठी अहोरात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. रेमडेसिविर १०० इंजेक्शन काल त्यांच्या हस्ते पटेल रुग्णायला उपलब्ध झाली असून एकूण इंजेक्शनपैकी ७५% इंजेक्शन हे पटेल रुग्णालयातील रुग्णांना (आवश्यक असलेल्या रुग्णाला प्रत्येकी २ इंजेक्शन मोफत) तर २५% इंजेक्शन हे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील रुग्णांना दिले जाणार आहे.