शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

परीक्षा संचालकांच्या हकालपट्टीसाठी अभाविपचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 8:11 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपुर्वीच संकेतस्थळावर झळकल्या होत्या.

पुणे : मागील काही दिवसांपासून हलगर्जीपणामुळे वारंवार पेपरफुटीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई तसेच परीक्षा विभाग संचालकांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात आंदोलन केले. विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपुर्वीच संकेतस्थळावर झळकल्या होत्या. दि. १५ आणि १६ फेब्रुवारीला या परीक्षा झाल्या. या प्रकाराची काही विद्याार्थ्यांनी विद्याापीठाकडे तक्रार केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या विद्यापीठ प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच संबंधित विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचे जाहीर केले आहे. याप्रकरणी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी दोषी आहेत. तसेच परीक्षा विभाग संचालक डॉ. अशोक चव्हाण यांना हे प्रकार रोखण्यात अपयश आल्याचा आरोप करीत अभाविपने शुक्रवारी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. यावेळी मोर्चा काढून विभागासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच परीक्षा पुन्हा न घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी आंदोलनात प्रतिकात्मकरित्या परीक्षा संचालकांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यावर पैसे फेकुन विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. प्रकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांना भेटण्यासाठी आत सोडले जात नसल्याने विद्यार्थ्यांनी गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डॉ. उमराणी यांनी कार्यालयातून बाहेर येत निवदेन स्वीकारले. पुढील दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला.-----------

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठ