शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

भीमाशंकर कारखान्याकडून शेतकऱ्यांची धूळफेक, कारखानास्थळावर शिवसेनेकडून आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 00:37 IST

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊसउत्पादक शेतक-यांच्या डोळ्यात ऊस बाजारभाव देण्याबाबत धूळफेक केली आहे. एफआरपीनुसार ४६८ रुपये अंतिम बाजारभाव येत्या १५ दिवसांत द्यावा, अन्यथा साखर कारखान्यासमोर उपोषण करून जनआंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक अरुण गिरे यांनी मंगळवारी दिला.

अवसरी - भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊसउत्पादक शेतक-यांच्या डोळ्यात ऊस बाजारभाव देण्याबाबत धूळफेक केली आहे. एफआरपीनुसार ४६८ रुपये अंतिम बाजारभाव येत्या १५ दिवसांत द्यावा, अन्यथा साखर कारखान्यासमोर उपोषण करून जनआंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक अरुण गिरे यांनी मंगळवारी दिला.शिवसेनेच्या वतीने भीमाशंकर कारखान्याच्या गेटसमोर बाजारभाव देण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा समन्वयक अरुण गिरे बोलत होते. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव ढोबळे, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनिल बाणखेले, शिवसेना नेत्या जयश्री पलांडे, अनिल काशिद, सचिन बांगर, रविंद्र वळसे पाटील, कल्याण हिंगे, अजित चव्हाण, दिपक घोलप, प्रविण थोरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा समन्वयक अरुण गिरे म्हणाले भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकºयांची फसवणुक केली आहे .आकड्यांचा खेळ करुन बाजारभाव देण्याबाबत गल्लत केली आहे. संपुर्ण राज्यात यंदाच्या वर्षी भीषण दुष्काळजन्य परिसिथती निर्माण झाली असुन आंबेगाव-शिरुर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन दिवाळी सणात केवळ १०० रुपयांचा हफ्ता जाहीर करुन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सातत्याने काबाड कष्टाने ऊस घालुन नावारुपास आणलेला कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतक-यांची क्रुर चेष्ठा चालवली आहे , असा आरोप गिरे यांनी केला. यावेळी शिवाजीराव ढोबळे, जयश्री पलांडे, रविंद्र करंजखेले यांची भाषणे झाली.शिवसेना नेत्यांचे निवेदन भीमाशंकर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी स्विकारले.प्रतिटन ३५०० हमीभावाची मागणीदुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे चालु वर्षी शेतकºयांच्या ऊसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा.सतत ३ वर्षे ऊस घालणाºया ऊस उत्पादक शेतक-यांना तात्काळ कारखान्याचे सभासद करावे. मयत सभासदांच्या वारसदारांची वारसनोंद करावी.भीमाशंकर कारखान्याच्या कर्मचा-यांचा खाजगी साखर कारखान्यांसाठी होणारा वापर बंद करावा.कारखान्याला ऊस पुरवठा करणाºया ऊस पुरवठादार शेतक-यांच्या दुष्काळग्रस्त गावांसाठी पाच टँकर व ५ हजार लीटर क्षमतेच्या पाचशे पाणी टाक्या पुरवाव्यात. शेतकºयांच्या ऊसाचे पैसे त्यांच्या खात्यात १५ दिवसात जमा करावे इत्यादी मागण्या केल्या आहेत.आंदोलन चुकीचे : आ. वळसे पाटीलअवसरी : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर ऊस बाजारभावासंदर्भात राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिवसेनेने केलेले आंदोलन चुकीचे आहे. ऊस उत्पादक शेतकºयांचा भीमाशंकर कारखान्यावर पूर्णपणे विश्वास असून बाजारभाव देण्याबाबत कारखाना कटिबद्ध आहे. भीमाशंकरने अंतिम दर असल्याचे म्हटले नसताना शिवसेनेने केवळ राजकीय स्टंट म्हणून शेतक-यांची दिशाभूल करून गैरसमजापोटी आंदोलन केले आहे, अशी टीका कारखान्याचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.मंचर येथील पूजन प्रेस्टिज येथे भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवार दि.६ रोजी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंंडे ,संचालक दादाभाऊ पोखरकर उपस्थित होते .सध्या शिवसेनेकडे लोकांसमोर जाण्यासाठी कोणतेही माध्यम नसल्याने त्यांनी चांगल्या चाललेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला टार्गेट केले आहे. असे सांगुन वळसे पाटील म्हणाले भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर ऊस उत्पादकांचा शिवसेना सोडुन भरवसा आहे.केवळ आम्हाला शेतक-यांचा कळवळा आहे. असे भासवण्याचा काही शिवसेना नेत्यांचा प्रयत्न आहे. परंतु ऊस उत्पादक शेतक-यांना भीमाशंकर साखर कारखान्याचे कामकाज पारदर्शकपणे चालु असल्याचा विश्वास आहे. चांगल्या चाललेल्या भीमाशंकर कारखान्याला अडचणीत आणण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने