कात्रज: मृत्यूचा सापळा म्हणुन कुपरिचित असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या संपूर्ण भूसंपादन न करता केलेले सुरु केलेले काम ३६ महिन्यांच्या मुदतीत संपेल की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. १५ मे रोजी लोकमतने याविषयी कात्रज -कोंढवा रस्त्याचे काम संथ गतीने या मथळ्या खाली सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती.त्याच प्रश्नावर आज मनसेच्या वतीने खोदण्यात आलेल्या खड्ड्यात होडी चालवून अनोखे आंदोलन करण्यात आले. ४० हुन अधिक बळी घेणा़ऱ्या ८४ मीटर डीपी रस्त्यासाठी २०१२ सालापासुन अनेक राजकीय आंदोलने करण्यात आली.सुमारे ४ वेळा या रस्त्याची निविदा विविध कारणाने रद्द झाली.राजकीय श्रेयवादात अडकलेल्या ३ किलोमीटरच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना यामध्ये लक्ष घालावे लागले.तीन महामार्गांना जोडणारा हा रस्ता आता पुणे महानगरपालिकेचा पथदर्शी प्रकल्प म्हणुन या रस्त्याचे काम सुरु केले आहे. मात्र पालिका कर्मचारी जरी भूसंपादन झाले असल्याचे दावे करीत असले तरी चाललेल्या संथ गतीमुळे हे काम वेळेत पूर्ण होईल का यामध्ये शंका निर्माण होत आहे.
कात्रज कोंढवा रस्त्यावर मनसेचे हटके आंदोलन, खड्ड्यातल्या पाण्यात चालवली होडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 18:06 IST
राजकीय श्रेयवादात अडकलेल्या ३ किलोमीटरच्या कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना यामध्ये लक्ष घालावे लागले...
कात्रज कोंढवा रस्त्यावर मनसेचे हटके आंदोलन, खड्ड्यातल्या पाण्यात चालवली होडी
ठळक मुद्देसंथ गतीने काम चालू असल्याचा आरोप : जागा ताब्यात नसताना सुरु केले कामसुमारे ४० हुन अधिक बळी घेणा़ऱ्या ८४ मीटर डीपी रस्त्यासाठी अनेक राजकीय आंदोलने तीन महामार्गांना जोडणाऱ्या पालिकेचा पथदर्शी प्रकल्प म्हणुन या रस्त्याचे काम सुरु