शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

पुणे शहरातील अरुंद रस्त्यांची रुंदी 9 मीटरपर्यंत करण्याच्या दृष्टीने महापालिकेची पावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:08 PM

प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास गेली अनेक वर्षे अरुंद रस्त्यामुळे रखडलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातील मोठा अडथळा दूर होणार

ठळक मुद्दे323 भागातील सुमारे १०३ किमी लांबीच्या रस्त्यांसाठी पालिकेने मागविल्या हरकती व सूचना

पुणे :  पुणे महापालिकेच्या हद्दीतील 323 भागातील सुमारे १०३ कि.मी. लांबीच्या अरूंद रस्त्यांची किमान रुंदी 9 मीटरपर्यंत करण्यासाठी महापालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.       या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास गेली अनेक वर्षे अरुंद रस्त्यामुळे रखडलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातील मोठा अडथळा दूर होणार आहे.      शहराच्या विकास आराखड्यास जानेवारी 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. परंतू ही मंजुरी देताना महापालिकेने सुचविलेल्या अनेक रस्त्यांची रुंदी पुर्वीप्रमाणेच अर्थात 1997 च्या विकास आराखड्यानुसार ठेवण्यात आली. परिणामी शहरातील अरूंद रस्त्याभोवती वसलेला मध्यवर्ती पेठांचा परिसर तसेच पालिकेत समाविष्ट असलेल्या गावांमधील जुन्या व जिर्ण होत आलेल्या इमारतींच्या पुर्नविकासाचे काम रखडले गेले आहे.       पालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांच्या विकास आराखड्याला मंजुरी देताना 12 मीटर व त्यापुढील अधिक रुंदीच्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या बांधकामांना टीडीआर वापराची परवानगी देण्यात आली. परंतू 2016 मध्ये टीडीआर वापराची अट 9 मीटर रस्तारुंदी पर्यंत कमी करण्यात आली. पण यानंतरही शहरातील रस्त्यांच्याकडेला असलेल्या हजारो इमारतींना पुर्नविकास करताना टीडीआर वापरता येत नसल्याने 9 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवर चटईक्षेत्र निदेर्शांक सिमित झालेला आहे.    शहरातील 9 मीटर पेक्षा कमी रुंद असलेल्या काही रस्त्यांवर शाळा, उद्याने, पाण्याची टाकी, दवाखाने, मैदाने अशा सुविधा देखिल आहेत. तसेच बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या दोनही बाजूनं निवासी सोसायट्या असून बहुतांश इमारतींच्या तळमजल्यावर व्यावसायीक गाळे ही आहेत. पण या अरुंद रस्त्यांवर पार्किंगच्या समस्येमुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याची समस्या होवून बसली आहे. त्यामुळे या अरूंद रस्त्यांची रुंदी किमान 9 मीटरपर्यंत वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाने महापालिका अधिनियम 210 (1)(ब) नुसार प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे. हरकती सूचना मागविल्यानंतर त्यावर सुनावणी होवून अंतिम अहवाल सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तMayorमहापौर