प्राध्यापक भरतीसाठी संचालक कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:53+5:302021-06-22T04:08:53+5:30

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालय व विद्यापीठातील सहायक प्राध्यापकांची सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत, तसेच ...

Movement in front of the director's office for professor recruitment | प्राध्यापक भरतीसाठी संचालक कार्यालयासमोर आंदोलन

प्राध्यापक भरतीसाठी संचालक कार्यालयासमोर आंदोलन

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालय व विद्यापीठातील सहायक प्राध्यापकांची सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत, तसेच तासिका तत्त्व (सीएचबी) धोरण पूर्णपणे बंद करून समान काम- समान वेतन या तत्त्वानुसार प्राध्यापकांना वेतन देण्यात यावे, आदी प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी नेट-सेट पीएच.डी.धारक संघर्ष समितीतर्फे उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने उच्च शिक्षणावर परिणाम होत आहे. प्राध्यापक संघटनेने शासनाकडे याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही शासनाने पदभरती संदर्भात आश्वासने देण्यापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे अखेर नेट-सेट पीएच.डी.धारक संघर्ष समितीने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष कल्पेश यादव यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला असून उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांना याबाबत निवेदन दिले आहे. तसेच प्राध्यापकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

Web Title: Movement in front of the director's office for professor recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.