शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणातील नियुक्त्यांसाठी दिल्लीत आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 19:01 IST

न्यायाधीश आणि तज्ञ सदस्यांची नेमणूक न झाल्याने पुणे, चेन्नई, कोलकत्ता व भोपाळ येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे कामकाज गेल्या वर्षभरापासून बंद आहे.

ठळक मुद्देलायर्स फॉर अर्थ जस्टीसच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी दिल्ली राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात आंंदोलन न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांच्या नेमणूका करण्याची मागणीदिरंगाईमुळे पाच हजारपेक्षा अधिक खटले प्रलंबित

पुणे : न्यायाधिकरणाचे कामकाज बंद असल्याने पर्यावरणाच्या प्रश्नाकडे होणा-या दुर्लक्षिततेच्या पार्श्वभूमीवर लायर्स फॉर अर्थ जस्टीसच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी दिल्ली राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात आंंदोलन केले. रजिस्ट्रार सौरभ कुलक्षेत्र यांना निवेदन देत न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांच्या नेमणूका करण्याची मागणी यावेळी केली.         न्यायाधीश आणि तज्ञ सदस्यांची नेमणूक न झाल्याने पुणे, चेन्नई, कोलकत्ता व भोपाळ येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे कामकाज गेल्या वर्षभरापासून बंद आहे. यामध्ये केवळ तीन आठवडे पुन्हा काम चालले परंतु, या काळात न्यायाधिकरणातील सर्व याचिकांना वेळ मिळू शकला नाही, असे निवेदनात म्हंटले आहे. याबाबत अ‍ॅड. असिम सरोदे म्हणाले, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणातील क्षेत्रीय बेंच 0कार्यन्वित नाही.तसेच, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तात्पुरत्या स्वरूपात सुरू आहे. नदी प्रदूषण, खाणकाम, मेट्रो, पुतळे बांधकाम, कच-याचा निपटारा आणि प्रक्रिया यासारख्या हजारो केसेस राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात न्यायिक व तज्ञ सदस्यांची नेमणूक न झाल्याने प्रलंबित आहेत. राजकीय उदासीनतेसोबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची व्याप्ती व अधिकार कमी करण्याचे देखील हेतुपरस्पर प्रयत्न सुरू आहेत. या दिरंगाईमुळे पाच हजारपेक्षा अधिक खटले प्रलंबित आहेत. न्यायाधिकरणात न्यायिक व तज्ञ सदस्यांच्या नेमणूका करण्याचे अधिकार पर्यावरण व वन मंत्रालयाचे आहे. लोकशाही यंत्रणा खिळखिळ्या करण्याचे कारस्थान सरकारी पातळीवरून केले जात असल्याचा आरोप अ‍ॅड. सरोदे यांनी केला.         खटल्याचा निकाल देताना त्यात तज्ज्ञ सदस्यांनी त्यांचे विचार देखील मांडावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. लायर्स फॉर अर्थ जस्टिसचे दीपक चटप, अपूर्वा भोसले, मानसी डागा, वैष्णव इंगोले,  बोधी रामटेके, काजल मांडगे, ऋषिकेश जाधव, पांडुरंग खांडेकर, चेतन शेलार, शुभम चौधर, भूपेंद्र पवार,  विक्रांत खरे यांच्यासह आदी विद्यार्थी उपस्थित होते. १५ दिवसांत एनजीटी  कार्यन्वित न झाल्यास दिल्ली येथे आंदोलनाचा इशारा यापुर्वी केलेल्या आंदोलनात देण्यात आला होता.

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्लीenvironmentवातावरणCourtन्यायालय