गोवंश व गोमांस बेकायदेशीर वाहतूकविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:24+5:302021-07-07T04:12:24+5:30
दुर्गा वाहिनी पश्चिम महाराष्ट्र संयोजिका अॅड. मृणालिनी पडवळ यांचे मार्गदर्शनाखाली आळेफाटा चौकातील शिवाजी महाराजांचे पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. ...

गोवंश व गोमांस बेकायदेशीर वाहतूकविरोधात आंदोलन
दुर्गा वाहिनी पश्चिम महाराष्ट्र संयोजिका अॅड. मृणालिनी पडवळ यांचे मार्गदर्शनाखाली आळेफाटा चौकातील शिवाजी महाराजांचे पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य डी. बी. वाळुंज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे जयेश जंगम, बाळासाहेब कु-हाडे, रमेश पवार, बंटी फुलसुंदर, अक्षय जगदाळे, सुमित शिनगारे, सागर भोर, अतुल थोरात उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे प्राणी संरक्षण कायद्यान्वये गोवंश वाहतूक व त्याची कत्तल यावर बंदी आहे. यामुळे प्रशासनाने कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून परिसरातून होणारी गोवंश व गोमांस मासाची बेकायदेशीर वाहतूक व विक्री थांबवावी, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली. यानंतर आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
आळेफाटा चौकात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व दुर्गा वाहिनी यांचे आंदोलन.