शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

कनेरसरमध्ये नियम धाब्यावर बसवून डोंगर होतोय भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 15:41 IST

गौणखनिज उत्खननासाठी शासनाची परवानगी न घेता, रॉयल्टी न भरता राजरोसपणे काम चालू आहे... 

ठळक मुद्देबेकायदा गौणखनिजाचे उत्खननदुर्लक्षामुळे लाखो रुपयांचा बुडतोय महसूलकनेरसर परिसरात आठ-दहा कंपन्यांचे उत्पादन सुरू ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर संबंधित ठिकाणी गेले तिथे येण्यास मज्जाव विकासाच्या गोंडस नावाखाली परदेशी कंपन्या भारतात येऊन वनसंपदा नष्ट

पुणे : कनेरसर (ता. खेड, जि. पुणे) येथे दोन कंपन्यांनी तीन महिन्यांपासून डोंगराचे सपाटीकरण सुरू केले आहे. औद्योगिकीकरणासाठी सपाटीकरण होत असले तरी गौणखनिज उत्खननासाठी शासनाची परवानगी न घेता, रॉयल्टी न भरता राजरोसपणे काम चालू आहे. डोंगरावरील वृक्षही बेकायदा हटविले आहेत. या उत्खननाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी यांना देऊन काम थांबवले जावे, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे भाजप युवा मोर्चाचे माजी खेड तालुकाध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. मंडल अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा करून कंपन्यांना काम थांबविण्याच्या सूचना देऊनही काम चालू आहे, अशी चर्चा परिसरात आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. एसईझेड शासनाने स्थापन केले, नंतर रद्द केले, कनेरसर परिसरात आठ-दहा कंपन्यांचे उत्पादन सुरू आहे. रोजगारनिर्मिती व विकासासाठी औद्योगिकीकरण गरजेचे आहे, परंतु नियम धाब्यावर बसवून विकास कशासाठी? डोंगरावर असलेले वृक्ष आधुनिक यंत्रसामग्रीने भुईसपाट केले असून गौणखनिज उत्खनन करून सपाटीकरण वेगाने चालू आहे. डोंगर उत्खननाला शासनाने परवानगी दिली आहे किंवा नाही, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास दौंडकर यांनी माहिती अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडे माहिती अधिकारान्वये निवेदन दिले आहे. महाराष्ट्र शासन वृक्षलागवडीसाठी जनजागृती करून मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवित असताना विकासाच्या गोंडस नावाखाली परदेशी कंपन्या भारतात येऊन वनसंपदा नष्ट करीत आहेत, ही खेदाची बाब आहे. महसूलमंत्री व उद्योगमंत्री यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी केली असून विधानसभा अधिवेशनात याप्रकरणी विधान परिषद सदस्यांच्या माध्यमातून लक्षवेधी मांडून शासनापुढे प्रश्नाचे गांभीर्य मांडले जाईल, असे टाव्हरे यांनी सांगितले..........ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर संबंधित ठिकाणी गेले तिथे येण्यास मज्जाव केला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेसीबी यंत्राच्या मदतीने उत्खनन करण्याचा सपाटा सुरू आहे. यावेळी मुरुमाची वाहतूक करण्यासाठी हायवा ट्रक वाहनात मुरुमउपसा सुरू असल्याने या घटनेचा पंचनामा करून वरिष्ठाकडे पाठविला आहे. - मोहिनी लोंढे, (तलाठी, कनेरसर मंडल)

टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीforestजंगलenvironmentवातावरण